Ahmednagar Accident: नगरमध्ये 2 कार आणि टेम्पोची धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू
Accident (PC- File Photo)

Ahmednagar Accident:  नगर कल्याण महामार्गावर (Accident On Nagar Kalyan Road) पारनेर तालुक्यातील धोत्रे येथे एक विचित्र अपघाच घडला आहे. तीन वाहनांने एकमेंकांना धडक दिल्याने हा विचित्र अपघात घडला आहे. (Accident News) या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहे. जखमीतील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.  नगर कल्याण महामार्गावर सकाळी साडेसातच्या सुमारास दोन कार आणि एक मालवाहतूक करणारा टेम्पो यांचा अपघात झाला आहे. या अपघातात ईरटीका कारमध्ये असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत.

मुंबईच्या कळंबोलीहून नगरच्या दिशेने ईरटीका कारमधून प्रवास करणाऱ्या भावसार कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. प्रीती भावसार, वेदांत भावसार आणि कारचालक रोशन या तिघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका विचित्र होता की मालवाहतूक करणारा टेम्पो पलटी झाला असून दोन्ही कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान अपघात झाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना मदत केली. जखमींना अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान या विचित्र अपघातानंतर रस्त्यावर काही काळ ट्रफिक जॅम पहायला मिळाला, यामुळे लोकांना काही काळ त्रास ही सहन करावा लागला. सध्या राज्यातील रस्ते अपघातात गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झाली असून या अपघातामुळे ्अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत.