मुंबई: पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्त सरकार आक्रमक होऊन महत्वाची पावले उचलत आहे. या घटनेबाबत देशात संतापाची लाट पसरली असून, स्थानिक पातळीवरही लोक या घटनेचा निषेध करत आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घातली असून, आता मनसे (MNS) च्या पुढाकाराने कुर्ल्यातील फिनिक्स मॉल (Phoenix Mall) मध्ये असणाऱ्या एच अँँड एम (H & M) शोरूममधून पाकिस्तानी कपडे हटवण्यात आले आहेत. काल मनसे सरचिटणीस सौ. रिटाताई गुप्त यांनी या शोरूमला भेट देऊन पाकिस्तानी कपडे न ठेवण्याबाबत सूचना दिली. या सूचनेची तातडीने अंमलबजावणी करत शोरूममधून पाकिस्तानी कपडे हटवण्यात आले आहे.
या मॉलमधील एच & एम शोरूममध्ये पाकिस्तानी विक्रीसाठी ठेवले असल्याची माहिती मिळताच, सौ. रिटाताई गुप्ता यांनी मनसे नगरसेवक श्री. संजय तुर्डे आणि उपविभाग अध्यक्ष श्री. अखिल चित्रे यांसह शोरूमला भेट दिली. यावेळी ‘सीमेवर आपल्यासाठी जवान शहीद होत आहेत, आणि तुम्ही पाकिस्तानी कपडे विकता. इथे लोकांना इतर कपडे आहेत, पाकिस्तानी कपडे विकले नाहीत तर कोणाचे काही नुकसान होणार नाही, त्यामुळे त्वरित पाकिस्तानी कपडे विकणे बंद करा’ अशा शब्दांत त्यांनी सूचना केली. याबरोबरच शोरूमने त्वरीत पाकिस्तानी कपडे काढून टाकण्यात येतील असे आश्वासन दिले. (हेही वाचा : पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी)
दरम्यान, 14 फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या संघटनेने भारतीय लष्करावर केलेल्या हल्ल्यात, 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले होते. भारतीय लष्करावरील हा सर्वात मोठा हल्ला समजला जातो. याबाबतीत पाकिस्तानच्या पाठींब्यामुळेच हे कृत्य झाले असल्याने, पाकिस्तानची कोंडी करण्यास भारताने सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून पाकिस्तानचा ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा काढून घेण्यात आला आहे. पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या वस्तूंचा सीमा कर 200 टक्क्यांनी वाढवला आहे. पाकिस्तानी कलाकारानावर बंदी घालण्यात आली आहे. आता मॉलमधून पाकिस्तानी कपडेदेखील हातावान्यता आले आहेत.