Ajit Pawar Slams Maharashtra Governor: शरद पवार यांच्यानंतर आता अजित पवार यांनीही राज्यपालांवर साधला निशाणा
Ajit Pawar And Bhagat Singh Koshyari

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत गेल्या दीड महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विराट मोर्चा मुंबईत (Mumbai) दाखल झाला होता. दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची भेट न घेण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी टीका केली होती. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

पुण्यात ध्वजारोहण सोहळ्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, शेतकरी मोर्चावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावेळी त्यांनी राज्यपालांच्या दौऱ्यावरही त्यांनी भाष्य केले आहे. “पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे राज्यपाल भेटू शकणार नाही, अशी माहिती मला मिळाली. मात्र, अशावेळी इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी कार्यक्रम थोडा बदलायचा होता. कोणाला प्राधान्य द्यायचे? हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे, असेही अजित पवार म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Farmers Protest, Tractor Rally: शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्थ करतो तो समाजकारणातून उद्ध्वस्त होतो- शरद पवार

राज्यपाल भगतसिंह यांनी बुधवारी शेतकरी शिष्टमंडळाची भेट घेतली नाही. यावर राजभवातून स्पष्टीकरण देण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे गोव्याच्या विधानसभेत सोमवारी अभिभाषण होते. यामुळे ते मुंबईत आंदोलकांच्या शिष्टमंडळाला भेटू शकणार नाहीत, याची पूर्वकल्पना संयोजकांना देण्यात आली होती, असे सांगण्यात आले आहे.