Devendra Fadnavis | Photo Credits: ANI

महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी सत्तेचा संघर्ष शिगेला असताना आज ( 4 नोव्हेंबर) दिल्लीमध्ये अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. दरम्यान या भेटीमध्ये ओल्या दुष्काळामध्ये शेतकर्‍यांचे नुकसान झालं आहे. त्याची माहिती महाराष्ट्राच्या काळजीवाहू सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. तसेच अमित शहा (Amit Shah) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये 30-40 मिनिटं भेट झाली आहे. या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील राजकीय पेच प्रसंगांवरही चर्चा झाली. मीडीयाशी महाराष्ट्र सदनामध्ये बोलताना त्यांनी लवकर सत्ता स्थापन होण्याबाबत आश्वस्त असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रातील 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे. त्याआधी नव्या सरकारचा शपथविधी होणं आवश्यक आहे. भाजप, शिवसेनेशिवाय 9 नोव्हेंबरपूर्वी महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकतं! हे आहेत 2 पर्याय.

 दरम्यान आज संध्याकाळी कॉंग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट होणार आहे. या भेटीत महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

ओल्या दुष्काळाचे संकट

महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांत चक्रीवादळामुळे अतोनात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी 70-100% शेतीचं नुकसान झालं आहे. अशा शेतकर्‍यांना

तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी केंद्र आश्वस्त आहे. असे फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारकडून पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाठवणार असल्याचं तसेच पीक विम्याचा फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

महायुतीचं काय?

महायुतीला विधानसभा निवडणूक 2019 मध्ये महायुतीला मतदारांचा कौल आहे. मात्र सत्ता वाटपावरून संघर्ष सुरू असल्याने शिवसेना आणि भाजपा युती सत्ता स्थापन करू शकणार का? यावर बोलणं टाळलं. मात्र महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर बातचीत केवळ अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झाली आहे. त्यामुळे आता भाजपाची रणनिती काय असेल? याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सत्तेच्या समीकरणावर कोण - काय बोलत आहे? यावर बोलणं भाजप पक्षाकडून कोणीही टिप्पणी करणार नाही असेही त्यांनी म्हटलं आहे.