Reservation | Image used for representational purpose | Photo Credits: Twitter

महाराष्ट्रभर आंदोलन केल्यानंतर मराठा समाजाला (Maratha Community)  राज्य सरकारने 16% आरक्षण दिले आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आता धनगर समाज, मुस्लिम समाज यांची आरक्षणाची मागणी वाढत आहे. त्यामध्ये आता ब्राम्हण समाजाकडूनही (Samast Brahmin Samaj) आरक्षणाची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी येत्या 22  जानेवारी  रोजी आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये समस्त ब्राम्हण समाज (Samast Brahmin Samaj)यांच्याकडून आरक्षणाची मागणी केली जात आहे. मोदी सरकारने नुकतेच मागास सवर्णांना 10% आरक्षण दिले आहे. मात्र हे आरक्षण कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता असून भविष्यात ते न्यायालयात न टिकल्यास काहीच फायदा मिळणार नसल्याची भीती सवर्णांमध्ये आहे.

समस्त ब्राम्हण समाजाच्या मागण्या काय आहेत ?

समस्त ब्राम्हण समाजाच्या मते पुजारी असणार्‍या ब्राम्हणांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. महाराष्ट्रात अशा ब्राम्हण समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विविध 15 मागण्यांसाठी समस्त ब्राम्हण समाज एकत्र येणार आहे. यामध्ये पूजा-अर्चा करणार्‍यांना दरमहा 5,000 रूपये पेंशनच्या स्वरूपात मिळावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

ब्राम्हण समाजाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खास Financial Developmental Board स्थापन करावे अशीदेखील मागणी आहे. प्रत्येक राज्यामध्ये ब्राम्हण विद्यार्थ्यांसाठी खास हॉस्टेल असावे, पदव्युत्तर शिक्षणासाठी मोफत शिक्षणाची सोय असावी.

डिसेंबर 2018 मध्ये महाराष्ट्र सरकारने 16% आरक्षण मराठा समाजाला दिले आहे. सरकारी नोकरी आणि शिक्षण संस्थेमध्य हे आरक्षण लागू आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये जातीनिहाय आरक्षण 68% आहे.