महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने 8 जूनला बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आज 9 जून पासून मुंबई विद्यापीठाने पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. काल्ल रात्री यासाठीचं वेळापत्रक उशिरा जारी करण्यात आले आहे. गुरुवार, 9 जूनपासून, प्रवेश अर्ज ऑनलाइन तसेच ऑफलाइन सुरू केले जाणार आहेत. ही प्रक्रिया 20 जूनपर्यंत सुरू राहणार आहे.. त्याचप्रमाणे, विद्यापीठ 9 जूनपासून, 20 जूनपर्यंत प्रवेशपूर्व नोंदणीसाठी mum.digitaluniversity.ac हे ऑनलाइन पोर्टल देखील उपलब्ध करून देणार आहे.
बहुतेक UG व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा या वर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्टच्या मध्यात होणार आहेत. राज्य सामायिक प्रवेश चाचणी (सीईटी) सेलद्वारे घेण्यात येणार्या सर्व प्रवेश चाचण्याही यंदा मुख्यतः ऑगस्टमध्ये घेतल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. Maharashtra Board HSC Result 2022 Declared: 12 वीचा निकाल जाहीर; mahresult.nic.in वर असे पहा मार्क्स.
मुंबई विद्यापीठ ट्वीट
मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ०९ जून २०२२ पासून प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी https://t.co/OrLDYFocNJ या संकेतस्थळावर सुरू करण्यात येत आहे
— University of Mumbai (@Uni_Mumbai) June 8, 2022
2021 पर्यंत, HSC हा राज्यातील बाकी बोर्डाच्या निकालांपैकी शेवटचा निकाल असायचा ज्यामुळे UG अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरू होत असे. पण यंदा राज्य विद्यापीठांना संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि भारतीय शाळा प्रमाणपत्र (ISC) यासह इतर शाळा मंडळांच्या 12वीच्या निकालांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.