Nagpur Sexual Abuse Case: नागपूर येथील महिलेवर सलग 5 वर्षे लैंगिक अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर युट्युबवर पाहून गर्भपात; एकास अटक
Photo Credit: File Image

महाराष्ट्रातील (Maharashtra) नागपुरमध्ये (Nagpur) पोलिसांनी एका पुरुषाला अटक (Arrest) केली आहे. ज्यावर 24 वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण (Sexual Abuse) आणि ती गर्भवती झाल्यावर गर्भपात (Abortion) करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. ही घटना उत्तर नागपुरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यूट्यूबवर व्हिडिओ पाहून बलात्कार (Rape) पीडितेने तिच्या घरी स्वत: चा गर्भपात केला तेव्हा ही बाब उघडकीस आली. आरोपी ज्याची ओळख सोहेल वहाब खान आहे. ती महिला आणि आरोपी सुमारे सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. तिच्या निवेदनात, महिलेने पोलिसांना सांगितले की खानने 2016 पासून तिचे वारंवार लैंगिक शोषण केले. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, जेव्हा ती गर्भवती झाली, खानने तिला स्वत: च्या गर्भपातासाठी यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला सांगितले. जेव्हा तिचे कुटुंब दूर होते तेव्हा तिने घरी नाळ कापून गर्भपात केला.

अहवालात म्हटले आहे की, खानने ताज नगर स्मशानभूमीत गर्भाचे दफन केले. काही आठवड्यांपूर्वी ही घटना घडली आहे. मात्र या आठवड्यात महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. पीडितेच्या कुटुंबाला असे वाटले की खानने तिला खोटी आश्वासने देऊन फसवले. कारण तो आधीच एक मूल असलेला कौटुंबिक माणूस होता आणि त्याच्याकडे पुरेसे उत्पन्न नव्हते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. हेही वाचा  Dombivli Gang Rape Case: डोंबिवली सामुहिक बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार- एकनाथ शिंदे

पोलिसांना समजले की खान एक ड्रायव्हर असून त्याचे यापूर्वी दोनदा लग्न झाले आहे.  पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्याने काही वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले होते आणि त्याला एक मुलगाही होता. तक्रारीनुसार पोलिसांनी 23 सप्टेंबर रोजी खानविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि त्याला ताब्यात घेतले. काल फॉरेन्सिक टीमने गर्भाचे अवशेष बाहेर काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. डीएनए सॅम्पलिंगसाठी आम्ही गर्भाचे अवशेष बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो पण दुर्दैवाने त्याचा शोध लागला नाही. आम्ही अजूनही गर्भाचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असे अधिकारी म्हणाले. पोलीस पुढील तपास करत आहेत.