कोविड साथीच्या रोगाविरुद्धच्या भारताच्या लढ्याचे कौतुक करत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी रविवारी (8 जानेवारी) म्हटले की, देशातील कोविड -19 साथीच्या रोगाचा (Covid Pandemic) सामना करण्यासाठी सरकार आणि आरोग्यसेवा कर्मचार्यांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिले. पूनावाला म्हणाले, आज प्रत्येकजण भारताकडे पाहत आहे. त्यापाठिमागे आमचे कोविड व्यवस्थापन हे एक प्रमुख कारण आहे. हे सर्व शक्य झाले ते सरकार, आरोग्य सेवा कर्मचारी आणि विषाणूवर नियंत्रण ठेवण्याचे एक समान उद्दिष्ट यामुळे. मी जगभरांतील अनेक देशांमध्ये गेलो आहे पण भारताने ज्या पद्धतीने कोविडची परिस्थिती हाताळली. तशी परिस्थिती इतर कोणत्याही देशाला हाताळता आली नाही. मी सर्वांना अवाहन केले की, तुम्ही भारतातच राहा छान राहा.
दरम्यान, पूनावाला यांच्या विधानाचा धागा पकडत देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही सीरम इन्स्टिट्यूट टीम, अदर आणि सायरसजींनी जगाच्या पाठीवर भारताची ताकद काय आहे हे जगाला दाखवून दिलेले काम पाहिले आहे. आम्हाला या नेतृत्वाचा अभिमान आहे!", असे ट्विट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. (हेही वाचा, Cyber Crime: सीरम इन्स्टिट्यूटची कोट्यावधी रुपयांची फसवणूक; सीईओ Adar Poonawalla असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी मारला डल्ला)
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी जनतेला कोविडच्या सध्या सुरू असलेल्या जागतिक वाढीमुळे घाबरू नका. तर सतर्क राहा आणि केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा सांगितले सांगितले. भविष्यातही कदाचीत कोविडची अनेक वेगवेगळी रुपे पाहायला मिळतील. पण, तरीही नागरिकांनी अनावश्यकपणे घाबरू नये आणि घाबरू नये म्हणून केवळ सरकारी स्त्रोतांद्वारे सामायिक केलेल्या माहितीवर विश्वास ठेवावा.