Saint Balumama Adampur | (File Image)

आदमापूर येथील श्री संत बाळूमामा (Adampur Shree Sant Balumama) म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान. या श्रद्धास्थानाच्या विश्वस्थांमधील दोन गटात तुफान राडा झाल्याचे वृत्त आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, श्री संत बाळूमामा ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये असलेल्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. त्यामुळे दोन्ही बाजूच्या विश्वसांनी परस्परांना चपलेने प्रसाद दिला. बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये गैरकारभार असल्याचा आरोप या आधीच होत होता. दरम्यान, गैरकारभार आणि विश्वस्त नेमणूक या मुद्द्यांवरुन दोन गट परस्परांना भीडले आणि सुरु झाला राडा.

विश्वस्थांनी एकमेकांना चपलांनी येथेच्छ प्रसाद दिल्यानंतर दोन्ही गटांनी पोलीस स्थानक गाठत परस्परांविरोधात तक्रारी दाखल केल्या. राजारामपुरी पोलिस स्थानकात आलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी की, आदमापूरचे सरपंच विजय गुरव यांनी बाळूमामा मंदिर ट्रस्टमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार धर्मदाय आयुक्तांकडे केली होती. याच प्रकरणात कायदेशीर सल्ला घेण्यासाठी गुरव हे वकिलाला भेटण्यासाठी कोल्हापूरला आले. याच वेळी ट्रस्टचे मानद अध्यक्ष असलेले धैर्यशील माने हेसुद्धा आपले समर्थक घेऊन आले होते. (हेही वाचा, Saint Balumama: मनोहर मामा वादाच्या भोवऱ्यात, संत बाळूमामा यांच्या वारसाच्या चर्चेवर स्पष्टीकरण; उंदरगाव येथील Manohar Mama वादग्रस्त ठरण्याचे कारण काय?)

दरम्यान, गुरव आणि भोसले यांच्यात ट्रस्टवर झालेल्या नेमणुकीच्या मुद्द्यावर जोरदार बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर पुढे मोठ्या हाणामारीत झाले. दोघांच्याही गटांनी परस्परांना चपला हातात घेऊन जोरदारपणे बदडून काढले. एकमेकांना चोप देणे सुरु असतानाच त्यांच्यातील हाणामारी थांबली. परंतू, तणाव कायम असताना दोन्ही गटांनी पोलीस स्टेशन गाठले आणि परस्परांविरोधात तक्रारी दिल्या.

श्री संत बाळूमामा देवालय ट्रस्ट 2003 मध्ये स्थापन करण्यात आले. या ट्रस्टमध्ये 18 विश्वस्त होते. यातील 6 विश्वस्तांचा मृत्यू झाला. पाठिमागील महिन्यातच कार्याध्यक्ष राजाराम मगदूम यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे ट्रस्टवर सद्या 12 विश्वस्त कार्यरत आहेत. त्यामुळे नव्या विश्वस्थांच्या नेमणुकीचा वाद पेटला असून तो हाणामारीपर्यंत पोहोचला आहे.