Madhavi Gogate Passes Away: अभिनेत्री माधवी गोगटे यांचे कोरोनामुळे निधन, वयाच्या 58व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Madhavi Gogate (Pic Credit - Instagram)

मराठी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. गेला माधव कुणीकडे, भ्रमाचा भोपळा यासारख्या लोकप्रिय नाटकांमध्ये तसेच घनचक्कर, सत्त्वपरीक्षा, डोक्याला ताप नाही अशा मराठी चित्रपटांबरोबरच मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री माधवी गोगटे (Madhavi Gogte) यांचे आज निधन झाले आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयात (Seven Hills Hospital) कोरोनामुळे (Corona Virus) त्यांची प्राणज्योत मालवली आहे. वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या मागे पती आणि विवाहित कन्या असे कुटूंब आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर घनचक्कर या चित्रपटात माधवी गोगटे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. गेला माधव कुणीकडे हे त्यांनी अभिनेता प्रशांत दामलेंबरोबर केलेले नाटक खूप गाजले होते.

राजा बेटा, सपने सुहाने लडकपन के, कोई अपना सा, ऐसा कभी सोचा न था, एक सफर, बसेरा, कहीं तो होगा अशा काही हिंदी मालिकांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. स्टार प्रवाहवरील स्वप्नांच्या पलीकडले, झी युवा वाहिनीवरील तुझं माझ जमतंय या मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केले. त्यांनी रंगभूमीबरोबरच मराठी व हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. हेही वाचा Kranti Redkar On Nawab Malik: अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी ट्विट करत नवाब मलिकांवर डागले शस्त्र, म्हणाल्या...

मराठी रंगभूमीबरोबरच मराठी चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केले. गेला माधव कुणीकडे, भ्रमाचा भोपळा या गाजलेल्या नाटकांबरोबरच, अंदाज आपला आपला अशा काही नाटकांमध्ये त्यांनी काम केले. दंगल टीव्हीवर त्यांची सिंदूर की किमत ही मालिका सुरू होती. ही मालिका त्या सोडणार अशी चर्चा रंगलेली होती. स्टार प्लसवरील अनुपमा या मालिकेशी त्या जोडल्या गेल्या होत्या. या मालिकेत अनुपमाच्या आईची भूमिका त्यांनी साकारली होती.