Representational Image (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. या निवडणुकीमुळे राज्याचा मुख्यमंत्री ठरवला जाणार आहे. निवडणुकीआधी एकीकडे नागरिकांना मुलभूत गरजा पुरवण्याची वचणे द्यायची, मात्र दुसरीकडे प्रशासनाचा हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर उठत आहे. नुकतेच हिंगोली जिल्ह्यात एका सिने अभिनेत्रीचा आपल्या बाळासह मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे हिचा मृत्यू प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. पूजा विष्णू झुंझार असे या अभिनेत्रीचे नाव असून, तिने 2 मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव इथे राहत होती. गरोदरपणामुळे तिने चित्रपटसृष्टीपासून काही कालावधीचा ब्रेक घेतला होता. दरम्यान प्रसूतीकळा आल्यावर तिला जवळच्या प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हा ग्रामीण भाग असल्याने इथे रुग्णालयात प्राथमिक गरजाही उपलब्ध नव्हत्या. या दरम्यान तिच्या बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर पुजाची ताभ्येत अजून खराब झाली. (हेही वाचा: वार्डबॉयने डॉक्टर सांगून केला गर्भवती महिलेवर उपचार, नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू)

डॉक्टरांनी पूजा हिंगोलीला घेऊन जाण्यास सांगितले. मात्र पुजला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध नव्हती. शेवटी बराच वेलानातर खासगी रुग्णवाहिका उपलब्ध झाली. त्यानंतर तिला हिंगोलीला घेऊन जात असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पूजाचे कुटुंबीय अतिशय संतप्त झाले आहेत. बाळ आणि बाळंतिणीच्या झालेल्या मृत्यूला त्यांनी प्रशासनाला जबाबदार ठरवले आहे.