सोनू सूद याने पोलिस कर्मचा-यांना दिल्या 25,000 फेस शिल्ड; गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून मानले आभार
Sonu Sood and Anil Deshmukh (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) यांनी कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान मुंबईतील अनेक स्थलांतरित मजूरांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचवले. यात त्याने आतापर्यंत लाखाहून अधिक मजूरांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचवले आहे. त्यात आता त्याने कोविड योद्धा (COVID Warriors) म्हणून जनतेची सेवा करण्यात तत्पर असलेल्या महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) कर्मचा-यांना 25,000 फेस शिल्ड दिले आहेत. त्याची ही मोलाची मदत पाहून गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्याचे आभार मानले आहेत.

सोनू सूद यांनी अनिल देशमुख यांची भेट घेतली आणि पोलिस कर्मचा-यांसाठी 25,000 फेस शिल्ड दिले. या अतुलनीय योगदानाबद्दल मी सोनू सूद याचा आभारी आहे असे आशयाचे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे. स्थलांतरित मजूरांना स्वगृही पाठवण्यासाठी केलेल्या कामाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोनू सूद याचे केले अभिनंदन

सोनू सूद च्या या कामाबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून टिका केली होती. मात्र 'अग्रलेख लिहीण्या पलिकडे काय केलंत?' असा थेट सवाल करत मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विटच्या माध्यमातून राऊतांवर निशाणा साधला होता.

अभिनेता सोन सूद याच्या या कामगिरीचे कौतुक मंत्री जयंत पाटील यांनीही केले होते. तर क्रिकेटर शिखर धवन याने देखील सोनूच्या या कार्याला ट्विटच्या माध्यमातून सलाम केला होता. या व्यतिरिक्त सोनू सूदने कोरोना व्हायरसच्या संकटात विविध माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. पीपीई कीट पुरवण्यापासून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी त्याने हॉटेल खुले करुन दिले होते.