गँगस्टर संतोष आंबेकरचा बंगला जमीनदोस्त (संग्रहित संपादित प्रतिमा)

अतिशय कर्तव्यनिष्ठ, तत्वनिष्ट, कामात चोख अशी ओळख असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe), सध्या नागपूर महानगरपालिका आयुक्तपद भूषवत आहेत. जेव्हापासून मुंढे नागपूर महापालिकेत रुजू झाले तेव्हापासून त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबाबत अनेक बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत. आता तुकाराम मुंढे यांनी अजून एक दणका देत, नागपूरमधील गँगस्टर संतोष आंबेकरचा (Santosh Ambekar) अलिशान बंगला जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले आहेत.

बुधवारपासून हा बंगला पाडण्याचे काम सुरु झाले. गेल्या महिन्याभरातील मुंढे यांची ही सर्वात मोठी कामगिरी आहे. याआधी त्यांनी रुजू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी लेखा आणि वित्त विभागातील चार कर्मचाऱ्यांना. कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात अनियमितता दाखवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला होता.

तर, गँगस्टर संतोष आंबेकर हा नागपूरसह विदर्भातील एक मोठा डॉन आहे. त्याचा नागपुरात इतवारी परिसरात अलिशान बंगला आहे. याच बंगल्यातून त्याचे सर्व काळे धंदे चालायचे. मारहाण, खंडणी, तरुणींची छेडछाड असे अनेक गुन्हे या बंगल्यातून घडले आहेत. गेली अनेक वर्षे आंबेकरचे हे गुन्हे चालू होते. पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये त्याच्यावर कारवाईला सुरुवात केली व 12 ऑक्टोबरला त्याला अटक करण्यात आली.

धमकावणे, खंडणी मागणे, मारहाण करणे, बलात्कार करणे, अवैध सावकारी करणे, नोटा बदलून देण्याच्या नावाखाली व्यापाऱ्यांची फसवणूक करणे अशा प्रकरणे अनेक गुन्हे आंबेकर याच्यावर नावावर दाखल होते. (हेही वाचा: कर्तव्यदक्ष तुकाराम मुंढे यांच्या कामाचा दुसऱ्या दिवशीच प्रत्यय; 4 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस)

त्यानंतर याबाबत नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेसोबत तुकाराम मुंढे यांची चर्चा झाली. यामध्ये आंबेकर याची अनधिकृत बांधकामे हटवण्याचा आदेश मुंढे यांनी दिला. त्यानुसार बुधवारी महापालिकेच्या अतिक्रम विरोधी पथकाने बंगला पाडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या बंगल्यासाठी गुलाबी जयपुरी दगड वापरण्यात आले आहेत. बंगल्याचा एकूण एरिया व सजावट पाहता या बंगल्याची किंमत कोटींच्या घरात असल्याचे बोलले जात आहे.