चेंबूरच्या Trombay Education Society च्या N G Acharya and D K Marathe College मध्ये ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे. यामध्ये हिजाब आणि बुरखा प्रमाणेच रिप्ड जिन्स, टी शर्ट, रिव्हिलिंग ड्रेसेस, जर्सी यांना बंदी घालण्यात आली आहे. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये शिस्त राखण्यासाठी हा ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे. दरम्यान या बाबत कोर्टानेही कॉलेजला पाठिंबा देत हा ड्रेस कोड म्हणजे विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन नसल्याचं म्हटलं आहे.
27 जूनला कॉलेजकडून नोटीस जारी करत विद्यार्थ्यांना कॉलेज मध्ये येतात फॉर्मल आणि साजेशे कपडे परिधान करण्याचं आवाहन केले आहे. मुलांसाठी ट्राऊजर सह पूर्ण किंवा अर्ध्या बाह्याचे शर्ट परिधान केले जाऊ शकतात तर मुलींना भारतीय किंवा पाश्चात्य कपडे घालण्याची परवानगी आहे.
नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की धर्म प्रकट करणारे किंवा सांस्कृतिक असमानता सूचित करणारे कपडे विद्यार्थ्यांनी घालू नयेत. विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये जाण्यापूर्वी सामान्य खोलीत जाऊन हिजाब, बुरखा, नकाब, स्टोल, कॅप आणि बॅज यासारख्या वस्तू काढून टाकल्या पाहिजेत. नक्की वाचा: Hijab Ban For Degree Students: 'कॉर्पोरेट कंपन्या बुरखा परिधान करणाऱ्या महिलांना नोकरी देत नाहीत'; महाविद्यालयातील हिजाब बंदीचे चेंबूर कॉलेज व्यवस्थापनाकडून समर्थन .
ड्रेसकोडच्या या नियमावलीचा विशेषत: शिवाजी नगर, गोवंडी आणि मानखुर्द सारख्या भागातील महाविद्यालयातील मुस्लिम विद्यार्थ्यांवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये 75% हजेरी देखील बंधनकारक केली आहे.
HT च्या रिपोर्टनुसार, सोमवारी, जीन्स आणि टी-शर्ट घातलेल्या काही विद्यार्थिनींना हिजाब परिधान केलेल्या त्यांच्या मित्र मैत्रिणींच्या घोळक्यासह महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांवर संकुचित विचारसरणीचा आरोप केला असून ड्रेस कोडवरील नियम त्यांच्या धर्म आणि संस्कृतीच्या स्वातंत्र्याच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन करत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.