Satish Bhosale

Satish Bhosale: आज शिरुर न्यायालयाने सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सतीश भोसले हा आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. बीड जिल्हा सध्या विविध गुन्ह्यांच्या प्रकरणांमुळे देशभरात गाजत आहे. शिरूर कासार तालुक्यातील सतीश भोसले उर्फ खोक्या प्राण्यांची तस्करी व लोकांना अमानुष मारहाण प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून फरार होता. काल सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली.

प्रयागराज पोलिसांनी खोक्याला शिरुर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी सतीश भोसलेची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने सतीश भोसलेला सात दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान गुरुवारी बीड वनविभागाने खोक्या भोसले ज्या वस्तीत राहत होता ते घर जमीनदोस्त केलं. (हेही वाचा -Satish Bhosale Arrested: 'खोक्या' नावाने प्रचलित, सतीश भोसले यास अटक; शेवटचे लोकेशन प्रयागराज)

दरम्यान, गुरुवारी स्थानिक लोकांनी सतीश भोसले राहत असलेल्या वस्तीला आग लावली. यात सतीश भोसलेचे घर संपूर्ण जळाले असून त्याच्या कुटुंबियांनी स्थानिकांवर आरोप केले आहेत. तथापि, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, सतीश भोसलेला शिक्षा मिळाले हे योग्य झाले. मात्र, त्याच्या कुटुंबियांना का त्रास देण्यात येत आहे. (हेही वाचा, Santosh Deshmukh Murder Case: 'धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली खंडणीच्या संदर्भात बैठक'; भाजप आमदार Suresh Dhas यांचा मोठा आरोप (Video))

सतीश भोसलेच्या घरावर बुलडोजर फिरवण्यात आला. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या घरावर बुलडोजर का नाही फिरवण्यात आला? असा सवालही अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. तथापि, सतीश भोसलेवर मारहाणीसह वन्यप्राण्यांची तस्करी आणि इतर 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.