
कोकण रेल्वे मागील काही दिवसांमध्ये अनेक गोष्टींमुळे चर्चेमध्ये आहे. उशिराने गाड्या धावत असल्याने अनेक जण वैतागले आहेत. अशामध्ये आता कोकण रेल्वे मार्गावर हळवल फाटकाजवळ ट्रॅकवर अपघात झाल्याने तासभर गाडी खोळंबल्याचा प्रकार समोर आला आहे. हळवल फाट्याज्वळ ट्रॅकवर राजधानी एक्सप्रेसने 3 म्हशींना धडक दिली आहे. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला सोबतच राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांना त्रास झाला आहे.
मुंबई - मडगाव अशी राजधानी एक्सप्रेस धावत असताना ही घडना घडली आहे. यामध्ये गाडीच्या इंजिनामध्ये आणि रूळाचेही नुकसान झाले आहे. तासभराच्या या घटनेमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे. ट्रक वरही रूळाचे हूक निखळले होते. रेल्वेच्या कर्मचार्यांनी तातडीने म्हशींना दूर करून इंजिन आणि रूळ दुरूस्त केले. पण यामध्ये सुमारे तासाभराचा वेळ गेला. तासभरानंतर गाडी मडगावच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे.
दरम्यान गणेशोत्सावानंतर आता आठवडाभराच्या सुट्टीनंतर चाकरमनी पुन्हा मुंबई मध्ये परतत आहेत. अशा मध्ये त्यांना उशिरा धावणार्या ट्रेन्समुळे नाहक त्रास होत आहे. कोकणात सध्या जाण्यासाठी रस्ते, विमान आणि रेल्वे तिन्ही मार्गांवर काही ना काही विघ्न येतच होती त्यामुळे अनेकांचा प्रवास हा त्रासदायकच होता.