Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Nashik Shocker: नाशिक मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. कामावरून घरी जात असताना लष्कराच्या वाहनाची धडक झाली. कुंदन सोनोने असं अधिकाऱ्याचे नाव होते. वडनेर रोड परिसरात लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ लष्काराच्या टेम्पोचा सोनोनेंच्या दुचाकीला धक्का लागल्याने अपघाता झाला आणि अपघाता ते खाली पडून गंभीर जखमी झाले. लष्करी जवानांनी त्यांना उपचारासाठी नेले असताना आधीच प्राण सोडला.  (हेही वाचा- शालेय सहलीच्या बसला भीषण अपघात; शिक्षकाचा मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात पोलिस निरिक्षक म्हणून कुंदन सोनोने कार्यारत होते. गुरुवारी सांयकाळी कर्तव्य बजावून झाल्यानंतर ते घरी जाण्यास निघाले होते. वडनेर रोड परिसरात लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ सोनोने यांच्या दुचाकीवरील नियत्रंण सुटल्याने थेट लष्कराच्या ट्रकच्या चाकाच्या पाठीमागून खाली शिरले. लष्कराच्या ट्रकच्या चाका खाली काही तरी चिरडल्याचे समजताच, चालकाने जागीच ब्रेक लावला. यात ते गंभीर जखमी झाले. जवानांनी तात्काळ कुंदन यांना बाहेर काढले. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र, उपचाराआधीच त्यांनी प्राण गमावला.

या घटनेची माहिती पोलिस ठाण्यात देण्यात आली,पोलिसांनी त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, मुलगी यांना निधनाची माहिती दिली. या घटनेची माहिती परिसरात कळताच मोठी शोककळा पसरली. नाशिक पोलिस दलात एक अधिकारी गमवल्याने शोककळा पसरली आहे. गेल्या २३ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत होते.