Money | Image Used For Representational Purpose Only (Photo Credits: pixabay)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Raids) नाशिकमध्ये पाठिमागील 24 तासात दोन बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. या अधिकाऱ्यांना एसीबीने सापळा रचून ताब्यात घेतले. तसेच, त्यांच्याशी संबंधित मालमत्तांतून मोठे घबाड हाती लागल्याचेही सांगितले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आदिवासी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेशकुमार बागूल (Dineshkumar Bagul) यांना ताब्यात घेतलं आहे. दुसरीकडे रवींद्र चव्हाणके नावाच्या जीएसटीच्या अधिक्षकालासुद्धा एसीबीने ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. या कारवाईमुळे आदिवासी विभाग आणि जीएसटी अशा दोन्ही विभागांमध्ये खळबळ उडाली आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात दावा करण्यात आला आहे की, अधिकारी दिनेशकुमार बागूल यांच्यावर केलेल्या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे घबाडच एसीबीला आढळून आले. यात रोख रखमेसह इतरही काही मौल्यवान ऐवजाचा समावेशअसल्याचे समजते. कारवाई होत असल्याचे समजताच अधिकाऱ्याने दस्तऐवज असलेली बॅग गायब करण्याच्या उद्देशाने फेकल्याची माहती एसीबी अधिकाऱ्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे कालपासून सुरु झालेल्या या कारवाईची मोजदाद आजही सुरुच होती, असे सांगितले जात आहे. (हेही वाचा, Theft: मुंबईत सोन्यांसह 50 लाखांची रोकड घेऊन नोकराचे पलायन, मुंबई पोलिसांनी 'ही' युक्ती वापरत घेतलं ताब्यात)

दरम्यान, जीएसटी कर विभागाचे अधीक्षक असलेल्या रवींद्र चव्हाणके नामक अधिकाऱ्यालाहीलाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांना नाशिक येथील सिडको कार्यालयातून अटक करण्यात आल्याचे समजते. पाठिमागील काही काळापासून आयकर विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अशी वेगवेळे विभाग चांगलेच सक्रीय झाल्याचे पाहायाल मिळत आहे.