
Thane Crime: ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काळा जादूच्या नावाखाली एका 75 वर्षी वृध्दाला जळत्या कोळश्यावर नाचण्यास भाग पडल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. अंध्दश्रध्देच्या आहारी गेलेल्या वृध्दाला अशी वागणुक दिल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ही घटना ४ मार्च रोजी घडली आहे.( हेही वाचा- काळ्या जादूने म्हशीला मारल्याच्या संशयावरुन 6 वर्षांच्या मुलाची गळा घोटून हत्या)
मिळालेल्या माहितीनुसार, मुरबाड तालुक्यातील कर्वेळे गावात ही घटना घडली आहे. या घटनेतील वृध्द व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, पीडित वृध्द व्यक्तीचा हात धरून जळत्या कोळश्यावर नाचण्यास भाग पाडत आहे. काही जमाव ही घटना पाहत आहेत. तर काहींनी या घटनेची माहिती पोलिस ठाण्यात दिली.
गावाच्या मंदिराजवळ काळा जादू करत असल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पीडितेला मारहाण देखील केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी काळाजादू करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी मंगळवारी काही लोकांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 452 ( दुखापत, हल्ला ) 323, 324 (स्वैच्छिकपणे दुखापत करणे) अंतर्गत एफआयआर नोंदवला. 341 (चुकीचा संयम), 143 आणि 147 (दंगल) आणि महाराष्ट्र प्रतिबंध आणि मानवी बलिदान निर्मूलन, इतर अमानुष आणि अघोरी प्रथा आणि काळी जादू कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.