महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2019) मतदानाचा बहुचर्चित टप्पा आज 21 ऑक्टोबर रोजी पार पडला. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घेण्यात आलेल्या मतदानामध्ये राज्यात साधारण 60.5% मतदान नोंदवण्यात आले आहे. या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल मात्र तत्पूर्वी महाराष्ट्रातील जनतेच्या मतांचा कौल कोणाला हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझा (ABP Majha) आणि C वोटर तर्फे एक्झिट पोल (Exit Poll) जाहीर करण्यात आला आहे. यानुसार दुपारी 3 वाजेपर्यंत नोंदवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार महायुतीच्या हाती पुन्हा एकदा सत्ता येणार असल्याचे चिन्ह आहे. एबीपी एक्झिट पोल नुसार 192 ते 216 जागांवर महायुती म्हणजेच शिवसेना (Shivsena) भाजपा (BJP) निवडून येईल. तसेच काँग्रेस (Congress)- राष्ट्रवादी (NCP) आघाडीला 55 ते 81 जागा व इतर पक्षांना 4 ते 21 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एबीपीच्या माझा आणि सी वोटरच्या आकडेवारीनुसार मुंबईतून महायुतीला सर्वाधिक जागा मिळवता येऊ शकते. तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना- भाजपा युती आणि काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी यांच्यात मतांची तफावत अगदी कमी असू शकते. राज्यात एकूणच इतर पक्ष जसे की, मनसे, वंचित बहुजन आघाडी किंवा रिपब्लिक परतीचे भवितव्य एबीपीच्या नुसार तरी धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.
एबीपी माझा आणि सी वोटर एक्झिट पोल आकडेवारी
मुंबई (36 जागा)
महायुती: 29-33
महाआघाडी :0-6
इतर: 1-2
ठाणे कोकण ( 39 जागा)
महायुती: 30-34
महाआघाडी : 3-7
इतर: 1-3
पश्चिम महाराष्ट्र (70 जागा)
महायुती: 40-44
महाआघाडी : 23-27
इतर: 0-3
उत्तर महाराष्ट्र (35 जागा)
महायुती: 21-25
महाआघाडी : 11-15
इतर: 0-1
विदर्भ (62 जागा)
महायुती: 47-51
महाआघाडी : 6-10
इतर: 2-4
मराठवाडा ( 46 जागा)
महायुती: 25-29
महाआघाडी : 12-16
इतर: 0-7
दरम्यान,यंदा अनेक पक्षांनी निवडणुकीच्या आधीच आपल्याला एक प्रबळ विरोधी पक्ष बनवण्यासाठी मतदान करा असे आवाहन केले होते मात्र सध्या या पक्षांचे स्थान कुठेही दिसून येत नाही. असं असलं तरीही ही आकडेवारी अंदाजाच्या आधारे वर्तवण्यात आलेली आहे. येत्या 24 ऑक्टोबर रोजी हा निकाल उघड होईल आणि त्यासोबतच महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या हाती येणार ही बाब या प्रश्नाचा खुलासा होणार आहे.