Vidhan Sabha Election Exit Poll 2019 (Photo Credits: File)

Maharashtra Vidhan Sabha Elections ABP Majha Exit Polls 2019: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री (Maharashtra CM) कोण होणार? राज्यात सत्ता कुणाच्या हाती येणार? यासहित अनेक प्रश्नांनाची उत्तरे शोधण्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा होता. आज मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सह राज्यात सर्वत्र एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान घेण्यात आले. संध्याकाळी 6  वाजेपर्यंत असणाऱ्या मतदान अवधीमध्ये राज्यात इतके टक्के मते नोंदवण्यात आली आहेत. 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल. तत्पूर्वी, मतदानामधून महाराष्ट्रातील जनमताचा कौल नेमका कोणाच्या पारड्यात आहे हे पाहण्यासाठी एक्झिट पोल (Exit Poll)  हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील काही वृत्तवाहिन्या हा एक्झिट पोल आज संध्याकाळी मतदानाच्या नंतर प्रदर्शित करतील. यंदा एबीपी माझा (ABP Majha) वर देखील एग्झिट पोल सादर केला जाणार आहे.

याआधी 18 ऑक्टोबर रोजी एबीपी माझा- सी व्होटर सोबत मिळून ओपिनियन पोल सादर केला होता. यानुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार असल्याचे म्हंटले होते. शिवसेना- भाजपा युतीसाठी 198 विजयी जागा तर महाआघाडी साठी 86 जागांवर विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

एबीपी माझा चा एक्झिट पोल कुठे पहाल?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 Live Updates: ठाणे येथे सुनील खंबे या अतिउत्साही कार्यकर्त्याने फेकली EVM वर शाई

दरम्यान, 2014 सालचा निकाल पाहता 288 पैकी 122 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते. तर शिवसेनेला 63 , काँग्रेसला 42 , राष्ट्रवादीला 41 जागा मिळवता आल्या होत्या. सध्या अस्तित्त्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2019 पर्यंत आहे. तत्पूर्वी घेण्यात आलेल्या निवडणुकीत यंदा निकाल कोणाच्या पारड्यात झुकणारा असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.