Crime: बीडमध्ये स्त्रीभ्रूण असल्याने 22 वर्षीय विवाहितेचा तिच्या संमतीशिवाय गर्भपात, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
Abortion | Representational Image | (Photo credits: PTI)

महाराष्ट्रातील बीड (Beed) जिल्ह्यातील परळी (Parli) शहरात एका 22 वर्षीय तरुणीला गर्भपात (Abortion) करण्यास भाग पाडल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेच्या विरोधानंतरही तिचा पती आणि सासरच्यांनी तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. 11 महिन्यांच्या मुलीची आई असलेली ही महिला दुसऱ्यांदा गरोदर (Pregnant) राहिली होती. जून महिन्यात ती काही महिन्यांची गरोदर असताना तिच्या सासूने तिला सोनोग्राफी सेंटरमध्ये नेले असता तिच्या पोटात स्त्रीभ्रूण (Fetus) असल्याचे समजले. संमतीशिवाय गर्भपात केला असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

त्यानंतर महिलेच्या सासरच्यांनी डॉक्टरांना घरी बोलावले. स्वामी नावाच्या डॉक्टरांनी त्यांच्या घरी जाऊन हा स्त्रीभ्रूण असल्याची खात्री केली. 15 जुलै रोजी डॉक्टरांनी पुन्हा त्यांच्या घरी जाऊन तपासणी केली. त्याने महिलेला एक इंजेक्शन दिले, त्यानंतर तिला उलट्या आणि जुलाब झाले. ते म्हणाले, महिला आजारी असताना, डॉक्टर 16 जुलै रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास तिच्या घरी गेले आणि तिच्या संमतीशिवाय गर्भपाताची प्रक्रिया सुरू केली. हेही वाचा Nashik Crime: कौटुंबिक वादात वडिलांनी केली मुलाला माराहाण, उपचारादरम्यान मुलाचा मृत्यु, नाशिक येथील घटना

डॉक्टरांनी गर्भ बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण ते होऊ शकले नाही तेव्हा त्यांनी गर्भ कापून गर्भ काढून टाकला. अधिकाऱ्याने सांगितले, त्यानंतर महिलेने तिच्या भावाला फोन केला, जो त्याच दिवशी सकाळी पुण्याहून परळीला पोहोचला. तो बहिणीला घेऊन पुण्यात आई-वडिलांच्या घरी गेला. तक्रारीच्या आधारे सोमवारी संध्याकाळी परळी येथील संभाजीनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 313 (महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात) आणि इतरांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.