Abhyudaya Cooperative Bank आणि NKGSB Cooperative Bank व्यवस्थापनाकडून ठेवीदारांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे अवाहन; बँकेतील ठेवी सुरक्षीत असल्याची दिली ग्वाही
NKGSB Cooperative Bank and Abhyudaya Cooperative Bank (Photo Credits: Facebook)

सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करीत आहे, सोबतच फेक बातम्या, खोटी माहिती यांना ऊत आला आहे. काही दिवसांपासून सोशल मिडियावर एक संदेश व्हायरल होत आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, अभ्युदय सहकारी बँक (Abhyudaya Cooperative Bank) आणि एनकेजीएसबी सहकारी बँक (NKGSBk Cooperative Ban) यामध्ये जर का तुमचे पैसे असतील तर दुसरीकडे ट्रान्सफर करा. बँकेच्या ऑडीटर कडून मिळालेली ही पक्की माहिती असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आता अभ्युदय कोऑपरेटिव बँक आणि एनकेजीएस कोऑपरेटिव बँक या दोन्ही बँकांच्या आर्थिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उभा करणाऱ्या अफवांचे दोन्ही बँकांनी खंडन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर एक संदेश व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केले आहे की या बँकांची आर्थिक स्थिती ढासळली असून आपले या बँकांमधील पैसे इतरत्र ट्रान्सफर करा. आता अभ्युदय सहकारी बँकेने आपल्या ग्राहकांना आणि ठेवीदारांना आवाहन करताना सांगितले आहे की, ठेवीदारांच्या पैशांच्या सुरक्षेबाबत बँकेच्या लेखापरीक्षकांनी (Auditors) कधीही चिंता व्यक्त केली नाही. नुकत्याच पूर्ण झालेल्या आर्थिक वर्षात बँकेने नफा कमावला आहे आणि बँक नेहमीच ठेवीदार, भागधारक आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करते. बँकेने पुन्हा सांगितले की, अभ्युदय को-ऑप मध्ये जमा असलेले लोकांचे पैसे सुरक्षित आहेत.

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला संदेश - 

याबाबत बँकेने आपल्या ग्राहकांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे, ‘अभ्युदय बँक सर्व सन्माननीय ग्राहकांना व भागधारकांना आश्वस्त करू इच्छिते की, बँकेची आर्थिक स्थिति अत्यंत समाधानकारक असून ठेवीदारांचे हितरक्षणार्थ बँक सदैव जागरूक असते. काही समाजकंटक सोशल माध्यमावर बँकेविषय बिनबुडाची, खोटी, खोडसाळ माहिती प्रसारित करीत असून, बँकेने त्याबाबत कठोर कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. सर्व ग्राहकांना नम्र विनंती आहे की ह्या अपप्रचाराकडे दुर्लक्ष करा. आम्ही आपणास ग्वाही देऊ इच्छितो की अभ्युदय बँकेतील ठेवी सुरक्षित असून चांगल्या सेवेसाठी बँक कटीबद्ध आहे- सीताराम चि.घनदाट-मानद अध्यक्ष, संदीप सी.घनदाट-अध्यक्ष’

यासह एनकेजीएसबी बँकेने म्हणतले आहे की, ‘एनकेजीएसबी बँक आपल्या सर्व भागधारकांना आणि ग्राहकांना खात्री देते की, 100 वर्षांहून अधिक वारसा, व्यावसायिक व्यवस्थापन, उत्तम नेटवर्थ आणि भांडवल पर्याप्तता, सातत्याने नफा, शिस्तबद्ध बँकिंग आणि पुरेसे लिक्विडिटीसह, आपल्याला सेवा देण्यासाठी बँक नेहमीच तत्पर असेल.’ (हेही वाचा: Bank Of Maharashtra च्या आर्थिक स्थिती बाबतच्या बातम्या अफवा; बॅंकेने दाखल केली सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार)

तर अशा प्रकारे दोन्ही बँकांनी आपली आर्थिक स्थिती उत्तम असून, चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेऊ नका असे सांगितले आहे.