फोटो सौजन्य - गुगल

Aarey Milk Colony Ghost Story: आरे मिल्क कॉलनी हा सुंदर परिसर असून एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे आणि चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी आवडते ठिकाण आहे. मात्र, जसजसा सूर्य मावळतो आणि अंधार पडतो, तसतशी एक वेगळीच कहाणी समोर येते. रात्रीच्या वेळी आरे मिल्क कॉलनी रस्त्यापासून दूर राहण्याचा सल्ला स्थानिक लोक देतात,खरच गोरेगाव आरे मिल्क कॉलनीत भूत आहे का असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. आरे मिल्क कॉलनी दिवसा गुन्हेगारी आणि बिबट्या दिसण्याचा धोका असला तरी, सूर्यास्तानंतर या परिसरात घडणाऱ्या अलौकिक घटनांबद्दल रहिवाशांना अधिक चिंता असते. सुमारे १० किलोमीटरच्या या भागात प्रवास करणाऱ्या अनेकांना आत्मा दिसल्या आहेत, त्यातील सर्वात भीतीदायक म्हणजे पांढऱ्या साडीतील एक महिला जी अनेकांना दिसली आहे. पांढऱ्या साडीतील स्त्रीबद्दलच्या कथा जितक्या भयावह आहेत तितक्याच रंजक आहेत. ती अनेकदा रस्त्याच्या कडेला दिसते, तिचे लांब केस अधिक भीतीदायक वाटतात. ती झाडाखाली उभी राहून हळूहळू रडते किंवा लिफ्टचा इशारा करते, असा वाहनचालकांचा दावा आहे.तरीही, ज्या क्षणी कोणी मदतीसाठी थांबते, त्या वेळी ती तिच्या खऱ्या रुपात येते.

अनेकांनी त्यांना कोणीतरी पाहत असल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या गाडीत त्यांच्या शेजारी कोणीतरी बसले आहे, अशी अनुभूती अनेकांना आली आहे. रात्री आरेतून जाणाऱ्यांचे अनुभव केवळ पांढऱ्या कपड्यातील महिलेपुरते मर्यादित नाहीत. लहान मुलांच्या रडण्याचा आवाज आणि वृद्ध व्यक्ती बेपत्ता झाल्याच्या भयावह घटनाही घडल्या आहेत. काही वाहनचालकांनी पांढऱ्या कपड्यातील महिलेला कारचा पाठलाग करताना पाहिले, तिचा आरडाओरडा रात्रभर ऐकू येत असल्याने ते घाबरले.

रात्री ड्रायव्हिंगचा आनंद घेत असलेल्या मित्रांच्या एका गटाची ही विशेष भयानक कहाणी आहे, जेव्हा ते एका महिलेला पाहून थांबले. तिच्याशी थोडा वेळ बोलल्यावर त्यांच्या लक्षात आले की ती आत्मा आहे.  त्या भागातून बाहेर पडल्यानंतरही तिचा आवाज कानावर पडत होता. आरे मिल्क कॉलनीच्या कथा अनेकांना निव्वळ शहरी दंतकथा वाटत असल्या तरी स्थानिकांनी शेअर केलेले भयानक अनुभव या विदारक घटनांना काही प्रमाणात सत्यता देतात.