Weather | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

दिवाळी झाली, ऑक्टोबर हीट झाली. आता नोव्हेंबर संपून डिसेंबर उजाडला तरी, राज्यात म्हणावी अशी थंडी जाणवत नव्हती. मात्र, आता उद्यापासून म्हणजेच 8 डिसेंबर पासून राज्यात पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पाहायला मिळेल. शिवाय विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचीही हजेरी लागल्याचे पाहायला मिळू शकेल, असे आयएमडीने आजचा हवामान (Aaj Che Havaman) अंदाज वर्तवताना आहे. तामिळनाडू,आंध्र आणि पश्चिम बंगाल लगतच्या समुद्रात आलेले फेंगल चक्रीवादळ महाराष्ट्रातील हवामान (Weather Forecast Maharashtra बदलास प्रामुख्याने कारण ठरले. परिणामी राज्यातील वातावरणात झालेल्या बदलामुळे आज राज्यातील 5 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातील आजचे हवामान काहीसे ढगाळ आणि पर्जन्यवृष्टीस पूरक असणार असणार आहे. ज्यामुळे विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळाली. तर उर्वरीत काही जिल्ह्यांध्येही ती शक्यता आहे. दरम्यान, पावसाचा अंदाज असला तरी, थंडीही बऱ्यापैकी आपली उपस्थिती जाणवून देईन अशी स्थिती आहे. (हेही वाचा, Mumbai Weather Update: मुंबईचे हवामान आणि AQI घ्या जाणून; ठाणे, पालघरमध्ये तुरळक पावसाची शक्यता)

फेंगल चक्रीवादळाचा परिणाम: काही ठिकाणी पाऊस

दरम्यान, इतर राज्यांमध्ये आलेले फेंगल चक्रीवादळ महाराष्ट्रासाठी पावसास कारण ठरले. ज्यामध्ये बुलढाणा, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार हे जिल्हे आणि त्यासोबतच दक्षिण महाराष्ट्रातीलही काही जिल्ह्यांचा समावेश आहे.

पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे

पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेले बहुतांश जिल्हे हे प्रामख्याने पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. हे जिल्हे खालील प्रमाणे:

  • कोल्हापूर
  • सातारा
  • सांगली
  • सोलापूर

वर उल्लेख केलेल्या जिल्ह्यांसोबतच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये म्हणजेत लातूर, धाराशीवमध्येही पावसाची शक्यता आहे. या राज्यांमध्ये थंडीचा जोर काहीसा कमी पाहायला मिळेल. पण पाऊस पडल्यास वातावरणात कमालीचा गारवा जाणवू शकतो.

फेंगल चक्रीवादळ हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल घडताना पाहायला मिळत आहे. समुद्रामध्ये अनेक ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. परिणामी हवा आणि ढगांची स्थिती बदलून पर्जन्यवृष्टीस पूरक स्थिती निर्माण होण्याची शक्यता कैक पटींनी वाढत आहे. कमी दाबाचे क्षेत्र कायम राहिल्यास आज संबंध दिवसभरासाठी असेच वातावरण राहील. रात्रीपासून थंडीचा कडाका वाढू लागेल.

दरम्यान, हिवाळा ऋतू सुरु असला तरी राज्यात अनेक ठिकाणी कडक ऊन पाहायला मिळते आहे. त्यामुळे नागरिकांना हिवाळ्यातही उन्हाळ्यासारखा अनुभव येऊ लागला आहे. रात्री थंडी, पहाटे थंडी आणि वारा तर सकाळी आकरा वाजलेपासूनच उन्हाचा पारा चढताना पाहायला मिळत आहे.