Aaditya Thackeray (Photo Credits: Twitter)

बहुप्रतिक्षित अयोद्धा प्रकरणाचा आज (9 नोव्हेंबर) निकाल जाहीर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज वादग्रस्त जमीन रामलल्लाची असल्याचं सांगत राम मंदिर उभारण्याचा मार्ग खुला केला आहे. यानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील 'जय श्री राम' अशी प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी देखील 'पहले मंदीर फिर सरकार' असं ट्वीट केलं आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी अयोद्धेला भेट दिली होती. त्यावेळेस तिघांनीही रामलल्लांचं दर्शन घेतलं होतं. तसेच राम मंदीर उभारण्याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा आहे. Ayodhya Judgment: अयोध्या में मंदिर, महाराष्ट्र मे सरकार,जय श्रीराम, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया.

ANI Tweet  

दरम्यान  मराठी आणि भूमीपुत्रांच्या हक्कांसाठी भांडणारी शिवसेना आता हळूहळू हिंदुत्त्वाच्या मुद्द्यांकडे जात असल्याची ही चिन्हं आहेत. अशी चर्चा आता पुन्हा रंगायला लागली आहेत. आदित्य यंदा पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढून आमादार झाला आहे.