CM Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 10 दिवसांचा इंग्लंड, जर्मनी दौरा आता पुढे ढकलण्यात आला आहे. काल आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांच्या दहा दिवसांच्या दौर्‍याबाबत ट्वीट करण्यात आलं होतं. यामध्ये त्यांनी 'CMO ने मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याचं वेळापत्रक जाहीर करावं, केवळ सहलींसाठी जात असतील तर हा करदात्यांचा पैसा वाया जात आहे. दिवसभराचं काम आठवडाभर खेचून दौर्‍याची सहल करू नका' असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर वार केला होता. दरम्यान आज पुन्हा त्यांनी ट्वीट करत आपल्या ट्वीट नंतर 30 मिनिटांतच मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा लांबणीवर पडल्याचा दावा केला आहे. दरम्यान आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी आणि इतर खासगी कारणांसाठी परदेश दौऱ्यात बदल करण्यात आले असल्याचं सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री 1 ऑक्टोबर पासून इंग्लंड आणि बर्लिनच्या भेटीवर जाणार होते. रिपोर्ट्सनुसार त्यांच्यासोबत शासकीय अधिकारी, उद्योगमंत्री उदय सामंत देखील जाणार होते.

आदित्य ठाकरे यांचं ट्वीट

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौर्‍यामध्ये करण्यात आलेल्या बदलावर बोलताना अंबादास दानवे यांनी 'डर अच्छा है' अशी प्रतिक्रिया दिली आहे. 'मला असं वाटत नाही की सुनावणीमुळे हा दौरा पुढे ढकलला असावा, परंतु निश्चितपणे दौरा पुढे ढकलण्यामागे काही ना काही कारण असावं.' असे ते म्हणाले आहेत.