CM Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Nagpur: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणं मुंबईतील एका तरुणाला चांगलचं भोवलं आहे. या तरुणाविरोधात नागपुरातील (Nagpur) लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड सहितेच्या कलम 354, 500, 504, 505, 507 आणि आयटी ॲक्टच्या कलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्थक कपाडी असं या तरुणाचं नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, सार्थक कपाडी हा ठाकरे गटाचा कार्यकर्ता आहे. सार्थकने मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप नेते चंद्रकांत पाटील, भाजप नेते अतुल भातकळकर, आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे या सर्वांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्वीट केले होते.  (हेही वाचा -Mumbai Crime: तरुणाकडून 39 महिलांच्या डीपीचा विनयभंग, अश्लील व्हिडिओ बनवून मागितले पैसे)

नागपुरातील काही भाजप कार्यकर्त्यांनी सार्थकचे हे ट्विट पाहिले. त्यानंतर त्याच्यावर नागपूरात गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात आमदार कृष्णा खोपडे यांनी तक्रार नोंदवली होती. यानंतर सार्थकवर गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वामागे ठाकरे गट असल्याचा आरोप खोपडे यांनी केला आहे.

कृष्णा खोपडे यांनी म्हटलं आहे की, खालच्या स्तरावर, आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्यक्ती ठाकरे गटाचा कार्यकर्ता आहे. पोलिसांनी याची चौकशी करावी, अशी मागणीही खोपडे यांनी केली आहे.