Nagpur: नागपूर येथील पाळीव कुत्र्याचे कृत्य मालक महिलेस पडले भारी; 6 महिने तुरुंगवासाच्या शिक्षेसह 50 हजारांचा भरावा लागला दंड
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

घरात कुत्रा पाळणे अनेकांना आवडते. परंतु, नागपूर (Nagpur) येथील एका महिलेला कुत्रा पाळणे चांगलेच महागात पडले आहे. संबंधित महिलेने पाळेलेला कुत्राने शेजारी राहणाऱ्या एका वर्षाच्या मुलाला चावा घेतला होता. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण न्यायलयापर्यंत गेले. कुत्र्याने चावा घेतल्याचे सिद्ध झाल्यानंतर नागपूर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निकाल दिला. याप्रकरणात दोषी ठरलेल्या कुत्र्याची मालक महिलेस 6 महिन्यांचा तरुंगवास आणि 50 हजार रुपये पीडित मुलाच्या आईला नुकसान भरपाई स्वरुपात देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली बदकुले असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. त्या श्रीकृष्ण नगरातील रहिवाशी आहे. परंतु, 29 जून 2014 रोजी बदकुले यांचा मुलगा घरासमोरील रस्त्यावर खेळत होता. त्यावेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या डॉ. संगीत बालकोटे यांचा कुत्रा सोनाली यांचा चावा घेतला होता. ज्यामुळे सोनाली यांच्या मुलाला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी सोनाली यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर आरोपी संगीता यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचे नमूद करीत त्यांना दोषी ठरविले. तसेच त्यांना 6 महिन्यांची शिक्षा आणि सोनल यांना नुकसान भरपाईच्या स्वरुपात 50 हजार रुपये देण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने दिला आहे. हे देखील वाचा- Mumbai Crime: क्रिकेट खेळण्यास मनाई केल्याने एकावर जीवघेना हल्ला; मुंबई येथील घटना

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. तसेच कुत्रा पाळण्याची आवड असलेल्या नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहेत. जर तुमच्याकडेही पाळी कुत्रा असेल तर काळजी घेणे अधिक गरजेचे आहे.