Auto Driver Sexual Abuse Minor Girl: रिक्षा चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Sexual abuse of a minor girl Nagpur PC TWITTER

Auto Driver Sexual Abuse Minor Girl: नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 10 वीच्या विद्यार्थिनीचा रिक्षा चालकाने विनयभंग (Molest) केल्याचा व्हिडिओ (Video) व्हायरल होत आहे. रिक्षा चालक नेहमी प्रमाणे पीडित मुलीला घरी घेऊन जाण्यासाठी शाळेजवळ आला आणि तिला घरी घेऊन जाण्या ऐवजी एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तिथे पीडित मुलीसोबत घृणास्पद कृत्य केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- लग्न मोडल्याने तरुणाला संताप अनावर; तरुणीचे अपहरण करून केला शिरच्छेद)

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील ओकांर नगर परिसरात रिक्षा चालकाने 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केला. एका जोडप्याने हा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना दिली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, रिक्षा चालक मागच्या सीटवर बसलेल्या पीडित मुलीजवळ जातो. तीच्या अंगाला बळजबरीने स्पर्श करतो. त्यानंतर पुढे जाऊन ड्राईव्हर सीटवर बसतो. पीडित तरुणी या प्रकरणातून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करते. त्याच्या समोर हात जोडून विनंती करते. परंतु रिक्षा चालक एक ऐकत नाही.

या घटनेचा व्हिडिओ पोलिस ठाण्यात मिळताच, नागपुर पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पीडितेला धक्का बसला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी चालकावर पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या पालकांनी अजनी पोलिस ठाण्याच तक्रार नोंदवला आहे. या धक्कादायक घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त करत मुली सुरक्षित नसल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभा केला आहे.