Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

मुंबईला लागून असलेल्या ठाणे (Thane) जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) परिसरात एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. येथील खडवली वृद्धाश्रमात (Khadavali old age home) 67 वृद्धांना कोरोनाची (Corona Positive) लागण झाली आहे.  सर्वांना तातडीने ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व 67 वृद्धांवर उपचार सुरू आहेत. या 67 बाधित लोकांशिवाय एका लहान मुलाला आणि एका लहान मुलीलाही कोरोना झाला आहे. म्हणजेच एकूण 69 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या नियंत्रणात आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या सर्वांना लसीकरण करण्यात आले आहे. या वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्याच्या मुलीला ताप आला होता. यानंतर त्या कर्मचाऱ्याची तब्येतही थोडी बिघडली होती.

तेव्हापासून संपूर्ण आश्रमात कोरोना पसरल्याची बातमी आहे. एकाच वेळी 69 जणांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरल्याने येथे भीतीचे वातावरण आहे. एकूण बाधित रुग्णांमध्ये 39 पुरुष, 28 महिला आणि 2 मुले आहेत. या रुग्णालयात हे नवीन कोरोना बाधित रुग्ण येण्यापूर्वी चार ते पाच रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाटले की, आता संसर्ग खूप कमी झाला आहे. पण एकाच वेळी इतके रुग्ण आल्याने तेही कृतीत उतरले आहेत आणि पूर्ण तत्परतेने रुग्णांची सेवा आणि काळजी घेण्यात गुंतले आहेत. हेही वाचा Mumbai AC Local Trains: हार्बर मार्गावर 1 डिसेंबर 2021 पासून एसी लोकल ट्रेनसेवा होणार सुरू, एकूण 12 एसी लोकल धाावणार

सध्या कोरोना बाधितांची संख्या कमी असल्याने जवळपास सर्व रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये आता हीच परिस्थिती दिसून येत आहे. रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये कर्मचारीही कमी करण्यात आले आहेत. या नवीन बाधितांच्या आगमनाची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने तातडीने तयारी सुरू केली. पुन्हा एकदा कोरोना वॉर्डात यंत्रणा सज्ज झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने पाचारण करण्यात आले.

शनिवारी संध्याकाळी सर्व बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांचे पथक अत्यंत गांभीर्याने या रुग्णांचे क्षणोक्षणी अपडेट नोंदवत आहे. पण त्याचवेळी एकाच ठिकाणी इतक्या लोकांना कोरोना झाल्यामुळे आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित झाले आहेत.