Pune Police | (Photo Credits: ANI)

पोलीस असल्याचे भासवून अनेकांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या एका व्यक्तीला पुणे शहर पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrested) केली आहे. प्रमोद बाळू ढेरे असे आरोपीचे नाव असून तो येरवडा (Yerwada) येथील रहिवासी आहे. पोलिसांनी नुकत्याच जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, येरवडा, कल्याणी नगर, कोरेगाव पार्क आणि विमान नगर भागात पोलिसांचा वेश धारण करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा शोध तीव्र करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, निरीक्षक गणेश माने यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी इराणी मार्केटमध्ये एक कार अडवली.   अधिका-यांना असे आढळले की कार चालकाचे केस पोलिस कर्मचाऱ्यासारखेच होते.

त्याने कारच्या विंडशील्डवर पोलीस असे लिहिलेले स्टिकर लावले होते. त्यानंतर केलेल्या झडतीत अधिकाऱ्यांना त्याच्या ताब्यात पोलिसांचा मोनोग्राम, लाठी आणि शिट्ट्या सापडल्या. कारसह वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत, असेही तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिक चौकशीत समोर आले की, गाडी चालवणारा ढेरे हा पोलिस नसून तो रात्री पोलिसांच्या गणवेशात फिरत होता.

त्याने पोलिस असल्याचे भासवून लोकांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.  भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक) आणि 170 (लोकसेवक व्यक्ती) नुसार येरवडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात ढेरे यांना अटक करण्यात आली. हेही वाचा Pune: पुणे आरटीओकडून रॅपिडो व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल, ऑटो रिक्षा चालकांनी विरोध केल्याने घेतला निर्णय

पोलिस कर्मचारी कसे काम करतात, कसे बोलतात आणि नागरिकांशी कसे वागतात हे समजून घेण्यासाठी ढेरे पोलिस स्टेशन आणि कोर्टाच्या परिसरात फिरत असल्याचे तपासकर्त्यांनी सांगितले. पोलीस असल्याचे दाखवून त्याने किती लोकांची फसवणूक केली आहे, याचा तपास सुरू आहे.