नवी मुंबई (Navi Mumbai) पोलिस मुख्यालयाच्या (Police commissioner office) इमारतीवर चढून एका युवकाने आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. योगेश चांदणे असे या युवकाचे नाव असून तो नवी मुंबई पोलिस मुख्यालयाच्या इमारतीवरील पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करणार असल्याचे जोरजोरात ओरडत होता. त्याला वाचवण्यासाठी पोलिस सातत्याने प्रयत्न करत होते. मात्र त्यात एक पोलिस कर्मचारी खाली पडून जखमी झाला.
योगेश आत्महत्या करणार असल्याचे सांगत असताना पोलिसांनी त्याला अनेक प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला. तसंच त्याने उडी मारल्यास त्याला झेलण्यासाठी कापडाच्या जाळ्या तयार ठेवण्यात आल्या होत्या. इतकंच नाही तर मदतीसाठी अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले होते.
The Indian Express Tweet:
VIDEO | A man was rescued by a QRT commando when he tried to jump off the Police commissioner's office in Navi Mumbai earlier this morning. pic.twitter.com/ZajQqw2GJS
— The Indian Express (@IndianExpress) June 22, 2019
योगेश याने उडी घेतल्याने त्याला समजावत असलेले पोलिस कर्मचारी स्वप्निल मंडलिक देखील खाली पडले. यात दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.