मुंबईत (Mumbai) सलग 3 दिवस पडणा-या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची अक्षरश: दैना उडाली आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसानही झाले आहे. आजही पावसाचा जोर कायम असल्यामुळे नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असा सल्ला प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहे. या सर्व गोष्टींपासून अज्ञात आहेत ती फक्त मुके प्राणी. मुंबईतील वडाळा परिसरात मुसळधार पावसात अडकलेल्या एका मांजरीच्या पिल्लाला (Kitten) वाचवून माणुसकी जपणा-या एका मुंबईकराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये तो माणूस त्या छोट्या मनीमाऊला छान कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या मोटरसायकलवर बसवून घरी घेऊन जात आहे असे चित्र पाहायला मिळेल.
पाहा ANI चा व्हिडिओ:
#WATCH A local in Wadala area of #Mumbai carries a kitten on his motorcycle after rescuing it, amid heavy rainfall in the city. He says, "I am taking the kitten home." pic.twitter.com/4qawgwJQzP
— ANI (@ANI) August 6, 2020
हा व्हिडिओ पाहून लोकांमध्ये अजूनही माणुसकी शिल्लक आहे हे स्पष्ट दिसते. या रस्त्यांवरील मांजरीच्या पिल्लाल आपण घरी घेऊन जाणार असल्याचे त्याने ANI शी बोलताना सांगितले.
मुंबई सह उपनगरात तसेच ठाणे, कल्याण-डोंबिवली, कोकण, तळकोकण भागात कालच्या दिवसभरात पाऊस चांगलाच जोर धरून कोसळत होता. पुढील 48 तास सुद्धा हीच परिस्थिती कायम राहील असे अंदाज हवामान खात्याने वर्तवले आहेत. मुंबईतील अरबी समुद्राच्या वर ढगाळ वातावरण असल्याने काही भागात आज कालच्या पेक्षाही मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता आहे.