CM Shinde Viral Video: एका चिमुकलीने एकनाथ शिंदेंना विचारल्या मुख्यमंत्री होण्याच्या टिप्स, मुख्यमंत्र्यांनी दिले 'असं' उत्तर, पहा मजेशीर व्हिडीओ
CM Eknath Shinde (PC - ANI)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि एक चिमुकली यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुलगी मुख्यमंत्री होण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा सल्ला विचारताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी अन्नदा डमरे यांनी एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन बंगल्यावर भेट घेतली. यावेळी मुलीने मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले की, पूरग्रस्तांना मदत करून तीही मुख्यमंत्री होऊ शकते का? आसाममध्ये पूर आला होता, तेव्हा तुम्ही लोकांच्या मदतीसाठी पाण्यातून गेला होता. मी पूरग्रस्तांना मदत करू का? मदत करून मी मुख्यमंत्री होऊ शकते का?

मुलीचे हे निरागस प्रश्न ऐकून तिथे उपस्थित सर्व लोक हसू लागले. मुलीचे मनोबल वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हो तुम्ही नक्कीच मुख्यमंत्री होऊ शकता. आम्ही त्यावर ठराव करू. यानंतर अन्नदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिवाळीत गुवाहाटी येथे नेण्यास सांगितले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हो नक्की जाऊ. शिंदे यांनी मुलीला विचारले की तुला कामाख्या मंदिरात जायचे आहे? अन्नदाने उत्तरात हो म्हटले. मुलीच्या या गोष्टी ऐकून मुख्यमंत्री शिंदे तिथे उपस्थित लोकांना सांगितले की ही मुलगी खूप हुशार आहे.

एकनाथ शिंदे यांनी 39 शिवसेना आमदारांसह पक्षात बंडखोरी केली आणि उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सोडण्यास भाग पाडले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदारांचा एक गट 22 जून रोजी गुवाहाटीला पोहोचला.  त्यानंतर आठ दिवसांनी म्हणजे 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.