Bhiwandi Fire: भिवंडी (Bhiwandi) परिसरात मध्यरात्री अचानक आग (Fire) लागल्याची घटना घडली. या भीषण आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. भिंवडी शहरातीस पिराणी पाडा परिसरात मध्यरात्री एका ३ मजली इमारतीला आग लागली. आगीचे धूर सर्वत्र पसरल्याने नागरिकांना बऱ्याच वेळ त्रास सहन करावं लागले. ही आग कशी लागली याचे कारण अद्यापही स्षट झाले नाही. इमारतीतील नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
आग लागताच स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. एका तासाच्या आत अग्नि तांडव नियत्रंणात आले. सोबत इमारतीच्या स्थानिकांना सुखरुप बाहेर काढले. पोलीसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली आहे. मध्यरात्री लागलेली भीषण आग नियत्रंणात येत नव्हती, अथक प्रयत्नाने ही आग विझवण्यात आली. बरेच तास आगीचा धूर परिसरात पसरली होते.
या आगीच्या घटने दरम्यान, एका पोलीस कर्मचाऱ्याला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. पोलीस कर्मचारी खड्ड्यात पडला आणि तो जखमी झाला अशी माहिती देखील समोर आली आहे. पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे ही आग कशी लागली आहे, याचे कारण शोधत आहे. या घटने कोणतीही जीवितहाणी झाली नाही अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे.