हॉस्पिटल अधिकाऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे पुणे पोलिसांनी सोमवारी एका व्यक्तीला बनावट अपंगत्व प्रमाणपत्र दिल्याच्या आरोपावरून ससून रुग्णालयातील (Sassoon hospital) कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितले की, आरोपी हॉस्पिटल विभागात डेटा ऑपरेटर (Data Opretor) म्हणून काम करत होता. जे अर्जदारांकडून आवश्यक कागदपत्रे गोळा केल्यानंतर अपंगत्व प्रमाणपत्र (Disability Certificate) जारी करतो. त्याने संग सिंग नावाच्या व्यक्तीला बनावट अपंगत्व प्रमाणपत्र जारी केल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना आढळले आणि त्याने या व्यक्तीकडून पैसे स्वीकारल्याचा पोलिसांना संशय आहे. हेही वाचा Badlapur: पत्नी आणि आईमध्ये जेवणावरून झाला वाद, नुकताच कामावरून घरी आलेल्या व्यक्तीची रागाच्या भरात महिलेला मारहाण
पोलिसांनी संशयितावर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 417, 465, 466, 468 नुसार गुन्हा दाखल केला.