प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

नागपूर येथील वर्धा मार्गावरील (Wardha Road Nagpur) एका पंचतारांकित हॉटेलमध्ये (Five-Star Hotel)  चालत असलेल्या एका मोठ्या सेक्स रॅकेटचा  (Sex Racket) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी वेश्या व्यवसाय करणारी तरुणी व तिची दलाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतीत पोलीस आता पुढील चौकशी करत आहेत. सापळा रचून, छापा टाकून पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा छडा लावला. पूजा रॉय (Pooja Roy) असे या दलाल महिलेचे नाव असून, संपूर्ण भारतात तिने आपले जाळे पसरवले असल्याचा संशय पोलिसांना आहे. तर वेश्याव्यवसाय करणारी तरुणी कोलकात्याची असून,  10 दिवसांपासून ती नागपूर परिसरात राहत आहे.

नागपूर परिसरातील एका नामांकित पंचतारांकित हॉटेल, ‘रॅडीसन ब्लू’मध्ये  (Radisson Blu Hotel Nagpur) हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. याची मुख्य सूत्रधार पूजा ही ग्राहकांना देश-विदेशातील तरुणी पुरवते ही बाबही पोलिसांना माहित होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी पुजला पकडण्याची योजना आखली. एका बनावट गिर्हाईकाला पुजाशी संपर्क करायला लावला. त्यानुसार पूजाने त्याला एका मुलीचा फोटो दाखवून,10 हजार असा दर सांगितला. गिऱ्हाईक तयार झाल्यानंतर तिने त्याला रॅडीसन ब्लूमध्ये बोलावून घेतले. दहा हजार मिळाल्यानंतर पूजाने त्याला रूम नंबर 202 मध्ये पाठवले. तिथे आधीच कोलकात्याची ही तरुणी हजर होती. त्यानंतर या गिऱ्हाईकाने पोलिसांना संकेत देताच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने रूम नंबर 202 वर छापा टाकला, आणि रूममध्ये असलेल्या या तरुणीला ताब्यात घेतले. त्यापूर्वीच त्यांनी पूजालादेखील ताब्यात घेतले होते. ही महिला स्कोका नावाच्या संकेतस्थळावरुन (Website) ग्राहकांना आकृष्ट करत असे, असा आरोप आहे. (हेही वाचा, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दलालास अटक; पालघर पोलिसांची कारवाई)

पोलिसांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात या दोघींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार (पिटा) गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान नोव्हेंबरमध्येही मुंबईच्या चेंबूर परिसरात पोलिसांनी पूजाला अटक केली होती. मात्र जामिनावर सुटून पूजाने परत तिचे हे कृत्य सुरु केले.