मुंबई विमानतळावरील जेट एअरवेज (Jet Airways) विमानाच्या कॉकपीटमध्ये (cockpit) चक्क घुबड आढळले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) जेट एअरवेजचे Boeing 777 विमान पार्क करुन ठेवण्यात आले होते. त्यात रात्रीच्या वेळेस हे घुबड सापडले. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी घुबडाला ताब्यात घेतले आणि त्यानंतर मुंबई विमानतळावरील फायर डिमार्टमेंटकडे सुपूर्त केले. त्यांनी त्या घुबडाला मुक्त केले. अधिकाऱ्यांनी घुबडाला पकडले असताना घुबडाने कोणत्याही प्रकारचा प्र्तिकार केला नाही किंवा चावण्याचा प्रयत्नही केला नाही. काहींनी तर त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा आनंदही घेतला.
विमानाचा एखादा दरवाजा उघडा राहिल्याने घुबड विमानात खाऊ शोधण्याच्या उद्देशाने घुसले असेल, अशी माहिती ग्राऊंड स्टाफने दिली.
Maharashtra: A barn owl was found in the cockpit of a Jet Airways flight earlier today when it was night parked at Mumbai Airport. The bird was later handed over to Fire Department of Mumbai International Airport Limited for release. pic.twitter.com/1o3FHyakKw
— ANI (@ANI) February 4, 2019
मध्यम आकाराच्या या घुबडाला गोलाकार पंख आणि छोटीशी शेपटी अत्यंत क्युट दिसत होती. त्याचे पाय लांब असून डोके मऊसूद आणि गोलाकार होते.