Crime, FIR | Archived, Edited, Symbolic Images)

Mumbai Hoarding Collapsed: मुंबई येथील मालाड येथे 10 X 25 फूटाचा होर्डिंग कोसळल्याने ६२ वर्षीय व्यक्ती जखमी झाला आहे. या प्रकरणी जखमी व्यक्तीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना 5 जून रोजी घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी जय किरण डेव्हलपरवर गुन्हा दाखल केला आहे. जय यांने नोटीस मिळाल्यानंतर ते खाली खेचण्यापूर्वी त्याच्या बांधकाम साइटवर होर्डिंग उभारले होते. गेल्या तीन आठवड्यांपूर्वी वादळीवाऱ्यामुले घाडकोपर येथे अनधिकृत होर्डिंग कोसळल्याने 16 जणांचा मृत्यू झाला. (हेही वाचा- 'घाटकोपर होर्डिंगचा पाया कमकुवत होता, वाऱ्याचा वेग सहन करण्याची क्षमता नव्हती';

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी ज्येष्ठ नागरिक महेंद्र कुर्ले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला, पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल. मालाड येथील जवाहरलाल नेहरू क्रीडा मैदानाबाहेर जय किरण बांधकाम साईटजवळ असताना ही घटना घडली.  बीएमसीची नोटीस मिळाल्यानंतर डेव्हलपरने होर्डिंग हटवले आणि बुधवारी संध्याकाळी 6 वाजता एका भिंतीवर लावले.

बुधवारी महेंद्र कुर्ले हे नातवाला घेऊन जाण्यासाठी मैदानावर आले. ते होर्डिंगजवळून जात असताना आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे ते त्यांच्या अंगावर पडले. त्याने बाजूला जाण्याचा प्रयत्न केला पण यात त्यांना किरकोळ दुखापत झाली. त्याच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी मालाड येथील पोलिस ठाण्यात धाव घेतली. भारतीय दंड संहिता कलम 336 आणि 337 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.