Thane Shocking: ठाण्यात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. धनंजय ननावरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अर्पण म्हणून आपली तर्जनी कापली. भाऊ नंदकुमार ननावरे आणि पत्नी उज्ज्वला ननावरे आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे त्यांनी हे कठोर पाऊल उचलले. नंदकुमार आणि उज्ज्वला या दोघांनी 1 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. नंदकुमार ननावरे हे भारतीय जनता पक्षाचे (आमदार) पप्पू कलानी यांचे स्वीय सहाय्यक होते.
धनंजय ननावरे यांनी त्यांची तर्जनी कापतानाचा व्हिडीओ बनवला असून सर्व प्रकार सांगितला आहे. व्हिडिओमध्ये धनंजय यांनी सरकार आणि पोलिसांना इशारा देताना म्हटलं आहे की, जर पोलिसांनी माझा भाऊ नंदूकुमारच्या खुनीवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही तर मी माझ्या शरीराचे आणखी काही भाग कापत राहीन आणि ते सरकारला अर्पण करील.
ठाण्याचे पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) शिवताज पाटील म्हणाले, आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत आणि तपासादरम्यान आम्हाला मृताच्या सुसाईड नोटमध्ये चार नावे आढळून आली. आम्ही त्यांना ताब्यात घेतले असून त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या प्राथमिक तपासानुसार, नंदकुमारने पत्नीसह कठोर पावले उचलण्यापूर्वी अंबरनाथमधील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना आणि पोलिस अधिकाऱ्यांनाही याची माहिती दिली. त्याने आपल्या ट्राउझरच्या खिशात एक सुसाईड नोटही टाकली ज्यामध्ये नावांचा उल्लेख होता. यात त्यांनी त्याच्यावर अत्याचार करण्यात आल्याचं म्हटलं आहे. ज्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने कठोर पाऊल उचलले.
A man in #Thane #chopped his own #finger on camera to protest the `tardy pace' of probe in the suicide case of his brother and sister-in-law. The man identified as Dhananjay Nanavare, is the brother of Nandkumar Nanavare who allegedly died by #suicide by jumping from the terrace… pic.twitter.com/srVYlJMmpP
— Free Press Journal (@fpjindia) August 19, 2023
संग्राम निकाळजे व अज्ञात व्यक्तींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता (IPC) कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र 18 दिवस उलटूनही या प्रकरणात कोणतीही प्रगती न झाल्याने नानकुमारच्या नातेवाईकांनी ठाणे पोलिसांच्या उच्चपदस्थांना या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्याची विनंती केली. 11 ऑगस्ट रोजी या प्रकरणाचा तपास ठाण्याच्या खंडणी विरोधी कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता.
न्याय न मिळाल्याने धनंजय नैराश्यात -
आपल्या मृत भावाला न्याय न मिळाल्याने धनंजय नैराश्यात होते. ते शुक्रवारी सकाळी घरातून निघून त्यांच्या मालकीच्या पोल्ट्री फार्ममध्ये गेले. त्यानंतर त्यांनी फोनवर एक व्हिडिओ शूट केला जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये धनजयने असेही म्हटले आहे की, माझ्या भावाने 1 ऑगस्टला आत्महत्या करून 18 दिवस उलटून गेले तरी पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. या प्रकरणाचा पाठपुरावा न करण्यासाठी आमच्यावर सातत्याने दबाव टाकला जात आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या अवयवाचा एक-एक भाग कापत राहणार आहे.
ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही काही दिवसांपूर्वी सातारा येथे गेलो होतो आणि कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. आमच्याकडे या प्रकरणाची जबाबदारी सोपवून एक आठवडा झाला आहे. तपास सुरू आहे.