Mumbai: मुंबईतील उपनगरीय कांदिवली (Kandivali) येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (Western Express Highway) वर बुधवारी अंगावर शहारा आणणारा अपघात (Accident) घडला. 23 वर्षीय तरुण मोटारसायकलवरून पडला. पाठीमागून आलेल्या मिनी बसच्या चाकाखाली चिरडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यासंदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिलं आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, दुचाकी महामार्गाच्या चुकीच्या लेनमध्ये घुसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आल्यानंतर पोलिसांनी दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले. उत्कर्ष शर्मा असे मृत व्यक्तीचे नाव असून तो कांदिवलीतील क्रांतीनगर येथील रहिवासी होता.
पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 304-ए (निष्काळजीपणामुळे मृत्यू) नुसार गुन्हा दाखल केल्यानंतर दुचाकीस्वाराला अटक करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा अधिका तपास सुरू असल्याचं पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. (हेही वाचा - Slab Collapses In Nerul: साळेगावात तीन मजली इमारताची स्लॅब कोसळला, दोघांचा मृत्यू तर 4 जण जखमेत)
दरम्यान, पालघर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अशीचं घटना घडली होती. दुचाकीच्या चाकात ओढणी अडकल्याने मोटारसायकलवर बसलेल्या 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. प्रात्त माहितीनुसार, कांदिवली येथील प्रतिमा यादव आपल्या पतीसोबत वसई भागातील एका मंदिरात दर्शन घेऊन परतत होत्या. महामार्गावरील बापाणे गावाजवळ तिची ओढणी मोटारसायकलच्या चाकात अडकली. तिचा गळा आवळल्याने तीदुचाकीवरून खाली पडली.
यात प्रतिमा गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.