MSRTC Mega Bharti 2019 मध्ये 932 महिलांनी केले ST बस ड्रायव्हर पदासाठी अर्ज, पहिल्यांदाच येणार एसटीचं सारथ्य महिलांच्या हाती
ST Bus (Photo Credits: Twitter)

लवकरच MSRTC च्या एसटी बसचं सारथ्य महिलांच्या हाती देण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील जिल्ह्यांसोबत राज्यात विविध ठिकाणी कंडक्टर, बस ड्रायव्हर या पदांसाठी नोकरभरती जाहीर करण्यात आली होती. यामध्ये महिलांना एसटी ड्रायव्हरच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली होती. त्यानुसार यंदा सुमारे 900 हून अधिक महिलांनी एसटी ड्रायव्हर - कंडक्टर पदासाठी अर्ज केले आहेत.  महामंडळाच्या 8022 चालक -वाहक पदाच्या भरतीसाठी राज्यभरातून सुमारे 42 हजार अर्ज आले आहेत.   MSRTC Mega Bharti 2019: एसटी महामंडळाच्या मेगा भरती मध्ये महिला उमेदवारांसाठी शिथिल झाले नियम

  महाराष्ट्रभरातून 8022 जागांसाठी नोकरभरती जाहीर केली होती. त्यापैकी नोकरीमध्ये महिलांना 30% आरक्षण असल्याने 2406 पदांसाठी महिला जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. मात्र सध्या 932 महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. 24 फेब्रुवारी रोजी यासाठी एसटीकडून प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. ज्या महिलांची निवड होईल त्यांना महामंडळामार्फत 1 वर्ष अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण मिळेल. प्रशिक्षण कालावधीत महिलांना महामंडळामार्फत स्टायपेंटदेखील मिळणार आहे.

सध्या 35,000 कंडक्टर एसटी महामंडळामध्ये काम करतात. त्यापैकी 4500 महिला कर्मचारी आहेत. नव्याने भरती होणार्‍या महिला कर्मचार्‍यांना पुरूषांप्रमाणे कामं दिली जाणार आहेत. यामध्ये महिलांना रात्रपाळीत काम करणं, रात्रीच्या शिफ्टमध्ये गाडी चालवणं अशी कामं दिली जातील. सुरूवातीला महिलांना कमी अंतराच्या प्रवासाच्या फेर्‍या दिल्या जातील.