7D Theatre (Photo Credits: Instagram)

मुंबईतील राणीची बाग, गेटवे ऑफ इंडिया (Gateway Of India), मरीन ड्राईव्ह (Marine Drive) यांसारखी मुंबईत बरीच प्रेक्षणीय अशी स्थळे आहेत. मुंबईत (Mumbai) आलेल्या प्रत्येक पर्यटकाने ही आणि यांसारखी बरीच ठिकाणे पाहिले नाही असे होणारच नाही. यांसोबत मुंबईतील पर्यटनाला आणखा चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने मुंबईत 'सेव्हन डी मिनी थिएटर ऑन व्हील' (7D Mini Theatre) सुरु केले आहे. 7D ही 3D ची पुढची आवृत्ती आहे. या थिएटरमध्ये दर्शकांना लघुचित्रपटाचा 7 डायमेंशनमध्ये आनंद घेता येईल.पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या मिनी थिएटरचा शुभारंभ करण्यात आला.

मटा ने दिलेल्या बातमीनुसार, हे मिनी थिएटर ऑन व्हील मुंबईतील मरिन ड्राइव्ह, गेटवे ऑफ इंडिया, दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, बँड स्टँड आदी ठिकाणी उपलब्ध असेल. पर्यटकांना किरकोळ शुल्क देऊन यावर विविध लघुपट, कार्टुन्स आदींचा सात डायमेन्शन्समध्ये आनंद घेता येईल.

हेही वाचा- खुशखबर! मुंबई लोकल चे पर्यटक तिकीट घेऊन, तिन्ही लाईन्सवर हवा तेव्हा प्रवास करता येणार

स्वप्नांची नगरी म्हणून ओळखल्या जाणा-या मुंबईत पर्यटनासाठी येणा-या लोकांची संख्या काही कमी नाही. मुंबईची सैर करण्याची मजाची काही और आहेत. मुंबईत अशी कित्येक प्रेक्षणीय, ऐतिहासिक अशी ठिकाणे आहेत, ज्यांना भेट दिले नाही तर आपण मुंबई पाहिली नाही असे म्हणता येईल. त्यामुळे या मुंबईची ओळख करून देण्यासाठी आणि मुंबईच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्यासाठी हे '7D मिनी थिएटर ऑन व्हील' ची संकल्पना उतरविण्यात आली आहे.

या संकल्पनेला पर्यटकांसोबता मुंबईकरांची देखील चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे.