कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने आता भारतातही घुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. मात्र कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. मुंबईत (Mumbai) आज कोरोनामुळे आज 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण 751 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोना बाधीतांची संख्या 7 हजार 625 वर पोहचली आहे. यापैंकी 1567 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकूण 295 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी कायदा लागू केला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता संचारबंदी घोषीत केली होती. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 17 मेपर्यंत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. कोरोना विषाणूने संपूर्ण देशात थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या संख्येत वाढ झाली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: नांदेड जिल्ह्यातील हजूर साहिब येथून पंजाब राज्यात परतलेले 137 जण कोरोना व्हायरस संक्रमित
एएनआयचे ट्वीट-
751 new #COVID19 cases reported in Mumbai, taking the number of cases to 7625: Municipal Corporation Greater Mumbai pic.twitter.com/JtzOTSvrBr
— ANI (@ANI) May 1, 2020
भारतात आतापर्यंत 35 हजार 365 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 9 हजार 065 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधीतांची संख्या 10 हजार 498 वर पोहचली आहे. त्यांपैकी 459 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 773 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजण्यात येत आहेत. एवढेच नव्हेतर WHO सोबतही चर्चा झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. देशात लॉकडाउनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत आम्हाला उपाय योजना करण्यासाठी अवधी मिळेल असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.