Digital Arrest | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Cyber Fraud Case In Jalgaon: जळगाव (Jalgaon) मधील 73 वर्षीय निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची डिजिटल अरेस्ट घोटाळ्यात (Digital Arrest Scam) 31.50 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्कॅमरने दूरसंचार विभाग आणि पोलिस अधिकारी असल्याचे भासवून तक्रारदाराला त्याचे सर्व गुंतवणूकीचे पैसे परत मिळवून वेगवेगळ्या लाभार्थी बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यास प्रवृत्त केले. प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार जळगावचा असून 16 जून रोजी तक्रारदाराला दूरसंचार विभागाचा असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचा फोन आला. कॉलरने तक्रारदाराला सांगितले की त्याच्याविरुद्ध दिल्लीत फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे आणि या संदर्भात पोलिसांकडून त्याला फोन येईल.

दरम्यान, काही वेळाने तक्रारदाराला पोलिस गणवेश परिधान केलेल्या एका व्यक्तीकडून व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल आला. त्या अधिकाऱ्याने तक्रारदाराला सांगितले की त्याचा 6.8 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभाग आढळला आहे. तसेच कॉल करणाऱ्याने तक्रारदाराला सांगितले की त्याला डिजिटल अटक करण्यात आली आहे आणि जर त्याने कोणतीही माहिती लपवली तर त्याला तीन वर्षांची शिक्षा होईल. घोटाळेबाजांनी तक्रारदाराला व्हॉट्सअॅपवरून बनावट अटक वॉरंट देखील शेअर केले. (हेही वाचा - Buldhana Viral Video: बुलढाण्यात भावाने केला मित्राच्या मदतीने भाऊ, वहिनीवर दिवसाढवळ्या हल्ला; सीसीटीव्ही फ़ूटेज वायरल (Watch Viral Video))

तथापी, 16 जून ते 23 जून या कालावधीत, घोटाळेबाजांनी तक्रारदाराला त्याचे सर्व गुंतवणूकीचे पैसे परत मिळवून विविध लाभार्थी बँक खात्यांमध्ये 31.50 लाख रुपये अनेक ऑनलाइन व्यवहारांमध्ये हस्तांतरित करण्यास प्रवृत्त केले. नंतर तक्रारदाराने त्याच्या मुलाला घटनेची माहिती दिली आणि त्याला फसवणूक झाल्याचे समजले. (हेही वाचा - Fake IAS Officer Arrested in Mumbai: मुंबई येथून तोतया आयएएस अधिकाऱ्यास अटक; बनावट ओळखपत्र वापरून कस्टम गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम)

या संपूर्ण प्रकारानंतर तक्रारदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. सायबर गुन्हे पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम 318 (फसवणूक), 336 (बनावट) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66ड (संगणक संसाधनाचा वापर करून बनावटगिरी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.