Coronavirus in India (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा फैलाव अजून सुरुच असून राज्यात हा आकडा 4666 वर वर जाऊन पोहोचला आहे. त्याचबरोबर नव्या आकडेवारीनुसार नागपूर (Nagpur) मध्ये कोरोना व्हायरसचे 7 नवे रुग्ण आढळले असून जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 88 वर जाऊन पोहोचली आहे अशी माहिती जिल्हा माहिती विभागाने दिली आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक असून येथील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या असलेल्या मुंबईत 155 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून येथील रुग्णांची संख्या 3090 जाऊन पोहोचली आहे. तर पुण्यात कोविड-19 चे 65 नवे रुग्ण समोर आले असून या जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 734 झाली आहे. Coronavirus in Mumbai: 155 नव्या रुग्णांसह मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या 3090 वर

दरम्यान मागील 24 तासात भारतात कोरोनाच्या 1336 नवीन रुग्ण आणि 47 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 18,601 वर पोहचला आहे. यामध्ये 14759 सक्रिय रुग्ण 3252 बरे झालेले रुग्ण आणि 590 मृतांचा समावेश आहे.

तर दुसरीकडे अमेरिकेत गेल्या 24 तासांत 1,433 कोविड बाधितांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक बातमी AFP न्यूज संस्थेने दिली आहे. त्यामुळे आता अमेरिकेत कोविड रुग्णांची एकूण संख्या 7,92, 759 वर पोहोचली आहे.