Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Mumbai Rain Update:  हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज, मंगळवार 7 जुलै रोजी मुंबई सह उपनगरात तसेच ठाणे (Thane), रायगड (Raigad), नवी मुंबई (Navi Mumbai)  येथे अधून मधून पावसाच्या सरी बरसतील. आज पाऊस सलग राहणार नाही पण कोसळायला लागला की मध्यम ते जोरदार स्वरूपात असेल. पुढील 24 तासांसाठी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर तसेच उपनगरीय भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहील. मागील चार दिवसांपासून मुंबईत सलग पाऊस होत आहे, यामुळे अनेक भागात पाणी साचल्याचे व्हिडीओज आणि फोटो सुद्धा व्हायरल होत होते, तीन दिवसांपासून मुंबईत समुद्रात सुद्धा मोठी भरती आणि वाऱ्याचा वेग अधिक आहे. अशावेळी अंगरिकांनी घराबाहेर पडू नये आणि मच्छीमारांनी समुद्रात जाऊच नये असे आवाहन करण्यात आले आहे.

टाइम्स च्या माहितीनुसार, मुंबईत यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीला सहा दिवसांमध्ये संपूर्ण जुलै महिन्यासाठी अपेक्षित पावसाच्या 60 टक्के पाऊस झाला आहे. रविवारी मुंबईत मागील पाच वर्षातील रेकॉर्ड ब्रेकिंग पावसाची नोंद झाली होती. केवळ मुंबईच नव्हे तर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पासून मागेल काही दिवस कायम आहे.

हवामान खाते उपमहासंचालक के. एस. होसाळीकर ट्विट

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र, औरंगाबाद, मराठवाडा, विदर्भ, पुणे शहरात अद्याप जोरदार असा पाऊस झालेला नाही मात्र पावसाची सद्य स्थिती सुद्धा समाधानकारक आहे. यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.