देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. देशभरातील 116 जागांसाठी हे मतदान पार पडले आहे, यात महाराष्ट्रातील 14 जागांचा समावेश आहे. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान चालले. यामध्ये संपूर्ण देशात 63.24%. इतक्या मतदानाची नोंद झाली आहे तर, महाराष्ट्रात 56.57% इतके मतदान झाले आहे. सर्वात कमी मतदान झालेल्या राज्यांमध्ये जम्मू आणि काश्मीरनंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. पश्चिम बंगाल येथे सर्वात जास्त मतदान झाले आहे.
राज्यनिहाय मतदान –
महाराष्ट्र - 56.57%
ओडिशा - 58.18%
त्रिपुरा - 78.52%
उत्तर प्रदेश - 57.74%
पश्चिम बंगाल - 79.36%
छत्तीसगड - 65.91%
दादरा आणि नगर हवेली - 71.43%
दमण आणि दीव - 65.34%
आसाम - 78.29%
बिहार - 5 9.97%
गोवा - 71.09%
गुजरात - 60.21%
जम्मू आणि काश्मीर - 12.86%
कर्नाटक - 64.14%
केरळ - 70.21%
आज सकाळपासून होत असलेल्या मतदानास दुपारपर्यंत मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र दुपारनंतर मतदानाचा टक्का घसरला. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर मतदारसंघात सर्वात जास्त मतदान झाले.
महाराष्ट्रात सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेले मतदान : जळगाव 52.28 टक्के, रावेर 56.98 टक्के, जालना 59.92 टक्के, औरंगाबाद 58.52 टक्के, रायगड 56.14 टक्के, पुणे 43.63 टक्के, बारामती 55.84 टक्के, अहमदनगर 57.75 टक्के, माढा 56.41 टक्के, सांगली 59.39 टक्के, सातारा 55.40 टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 57.63 टक्के, कोल्हापूर 65.70 टक्के, हातकणंगले 64.79 टक्के.