Missing (PC - File Image)

Navi Mumbai Missing Case: महाराष्ट्रातील ठाणे (Thane) जिल्ह्यातील नवी मुंबई टाऊनशिपमधून 24 तासांत चार अल्पवयीन मुली आणि दोन मुले बेपत्ता (Missing) झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. तर या पैकी एकाचा शोध लागला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 12 ते 15 वयोगटातील अल्पवयीन मुले 3 ते 4 डिसेंबर दरम्यान बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- नालासोपारा परिसरातून बेपत्ता झालेल्या 23 वर्षीय महिलेचा मृतदेह नदीत सापडला

मिळालेल्या माहितीनुसार, सहा मुलांपैकी, सोमवारी कोपरखैरणे परिसरातून बेपत्ता झालेल्या एका 12 वर्षाच्या मुलाचा ठाणे रेल्वे स्थानकावर शोध लागला. पोलिसांनी त्याला पालकाकडे स्वाधीन केले आहे. असे एका अधिकाऱ्याने माध्यमांना माहिती दिली. याव्यतिरिक्त, रबाले येथील एक 13 वर्षीय मुलगा सोमवारी पहाटे सार्वजनिक शौचालयात गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची नोंद झाली आणि तेव्हापासून तो सापडला नाही. त्यानंतर पनवेलमधील 14 वर्षीय तरुणी रविवारी तिच्या मित्राच्या मंडळीत गेली त्यानंतर ती स्वत:च्या घरी परतलीच नाही. कामोठे परिसरात 12 वर्षांची मुलगी सोमवारी घराबाहेर पडून बेपत्ता झाली.

सोमवारी दुसरी 13 वर्षीय मुलगी शाळेसाठी रबाळे परिसरातील घरातून निघाली आणि संध्याकाळी ती घरी परत आलीच नाही. कळंबोली भागातील एक 13 वर्षीय मुलगी रविवारी तिच्या वर्गमित्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला गेली होती आणि ती परतली नाही. या अश्या अनेक घटनांच्या नोंदी पोलिस ठाण्यात झाल्या आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी  गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मुलांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुदैवाने एकाचा शोध लागला.